अखेर ठरलं! विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' चित्रपटाचा प्रीमियर 'या' तारखेला होणार...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 जुलै 2020

शकुंतला देवी एक गणितज्ज्ञ होत्या. गणितावरच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांचे नाव 1982 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकेदेखील लिहिली.  

मुंबई : एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपटांचे प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचा प्रीमियर अॅमेझॉनवर प्राईमवर झाला होता. त्यानंतर विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' या चित्रपटाचा प्रीमियर कधी होणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती. अखेर ती उत्सुकता संपलेली आहे. 31 जुलै रोजी या चित्रपटाचा प्रीमियर अॅमेझॉन प्राईमवर होणार आहे.

मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

शकुंतला देवी एक गणितज्ज्ञ होत्या. गणितावरच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांचे नाव 1982 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकेदेखील लिहिली.  त्याच शकुंतला देवीचा एकूणच जीवनप्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा झाली आणि हा चित्रपट थिएटर्समध्ये आता प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे थिएटर्स कधी उघडतील याचा पत्ता नाही. त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर विकला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट ओटीटीवर येार हे निश्चित झाले आणि आज त्याच्या प्रीमियरची घोषणा करण्यात आली. 

नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये...

या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवीची भूमिका साकारीत आहे तर तिच्या मुलीची भूमिका सन्या मल्होत्रा साकारीत आहे. सन्याने यापूर्वी दंगल आणि बधाई हो या चित्रपटात काम केले आहे. शकुंतला देवीचे तिच्‍या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्‍ये जीशू सेनगुप्‍ता (मर्दानी 2) आणि अमित साध (ब्रीद, काय पो चे) हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनू मेनन या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. तिने आणि नयनिका महतानी यांनी पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद ईशिता मोईत्रा यांनी लिहिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidya balan starer Shankutaa devoi movie will release on amazon prime