Hrithik Roshan Fitness Tips
Hrithik Roshan Fitness Tipsesakal

Fitness: कोण म्हणेल हृतिक पन्नाशी गाठतोय; बॉडी बघाल तर...वाचा त्याच्या फिटनेसचं सीक्रेट

हृतिकसारखी बॉडी हवी असेल तर आजपासूनच फॉलो करा या टीप्स

Physical Fitness: बॉलीवुड अभिनेता हृतिक रोशनच्या डान्स मूव्ह्ज आणि अभिनयानंतर तो चर्चेत असण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्याचं फिटनेस. हृतिक ४८ वर्षांचा झालाय तरी त्याला बघता त्याचं वय मुळीच कळून येत नाही. मात्र त्याच्या फिटनेसच्या मागे तो खुप मेहनतही घेत असतो हेही तेवढंच खरं आहे. फिटनेसच्या बाबतीत हा अभिनेता बड्या बड्या अभिनेत्यांना मात देतो.

सोशल मीडियावर हृतिक बऱ्याच फिटनेस टीप्स शेअर करत असतो. बरेच चाहते त्याच्या फिटनेस टीप्स फॉलो करत असतात. तुम्हालाही त्याच्या फिटनेस टीप्स जाणून घ्यायच्या असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

काय आहे हृतिकचं फिटनेस सीक्रेट

हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विक्रम वेधा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृतिक त्याच्या प्रत्येक चित्रपटादरम्यान त्याच्या बॉडीवर मेहनत घेत असतो. त्याचे फिटनेस ट्रेनर यासोबतच त्याच्या डाएट आणि वर्कआऊटवरही विशेष लक्ष देतात. तसेच कुठेही बाहेर जाताना हृतिकचा कुक त्याच्या सोबत असतो. कुक त्याच्या डाएटप्रमाणेच त्याला नेहमी जेवण सर्व (Serve) करतो. तसेच हृतिक पार्टीमध्येही जाणं टाळत असतो.

Hrithik Roshan Fitness Tips
Hrithik Roshan : हृतिक रोशनने शेअर केले शर्टलेस फोटो, सबा आझाद म्हणाली...

असं असतं हृतिकचं वर्कआऊट रूटीन

हृतिक सगळ्यात आधी एक ते दीड तास वॉर्म अप करतो. एवढं वॉर्म अप केल्यानंतर ईजा होण्याची शक्यता कमी होते आणि मोबिलीटीही वाढते. त्यानंतर तो स्ट्रेचिंग करतो.

हृतिक चित्रपटांनुसार बदलतो डाएट

रिपोर्टनुसार हृतिक त्याच्या चित्रपटांनुसार त्याचं डाएट प्लान बदलत असतो. एका मुलाखतीत हृतिकच्या फिटनेस ट्रेनरने याबाबत सांगितले होते की, विक्रम वेधा चित्रपाटासाठी सध्या हृतिक साधं जेवण घेत आहे. मस्क्युलर बॉडीसाठी तो सध्या हाय प्रोटीन आणि हाय कार्बयुक्त डाएट घेत आहे.

Hrithik Roshan Fitness Tips
Fitness Tips : 'या' कारणांमुळे मेहनत घेऊनही कमी होत नाही पोट

हृतिकच्या डाएटमध्ये असतात या गोष्टी

हृतिक रोशन ब्रेकफास्टमध्ये ८ अंड्यांसह दोन मल्टीग्रेन टोस्ट आणि एक अॅवोकॅडो घेतो. लंचमध्ये तो ब्राऊन राईस, चिकन आणि सलाद घेतो. तसेच हृतिक प्री आणि पोस्ट वर्कआऊटमध्ये स्नॅक्स आणि नट्स घेतो. तो एग व्हाईट, चिकन, सलाद, मटन आणि फिशदेखील खातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com