Vikrant Rona : 'विक्रांत रोना'ची जादू, रणबीर कपूरचा 'शमशेरा' पडला मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiccha Sudeep's Vikrant Rona

Vikrant Rona : 'विक्रांत रोना'ची जादू, रणबीर कपूरचा 'शमशेरा' पडला मागे

दाक्षिणात्य चित्रपटांची यशस्वी वाटचालीची परंपरा सुरुच आहे. आता या यादीत किच्चा सुदीपचा (Kichcha Sudeep) चित्रपट 'विक्रांत रोना'चाही (Vikrant Rona) समावेश झाला आहे. त्याने तिसऱ्या विकेण्डला कमाल केली आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात करुन ३५ कोटींचा विक्रमी गल्ला जमावला होता. या प्रकारे तो या वर्षातील टाॅप ओपनिंग करणारा अखिल भारतीय चित्रपट बनला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा कमाई मंदावली. मात्र विकेण्डला विक्रांतने पुन्हा जोर पकडला. (Vikrant Rona Kichcha Sudeep Starrer High Collection In Box Office Compare To Shamshera)

किती गल्ला ?

वृत्तानुसार चित्रपटाने तीन दिवसांत ८० कोटींचा आकडा पार केला आहे. या प्रकारे बाॅलीवूडच्या 'शमशेरा' आणि 'सम्राट पृथ्वीराज'लाही मागे टाकले आहे. दोन्ही चित्रपटांचा लाईफ टाईम कलेक्शन चांगला होऊ शकला नाही. व्यापार विषयक सूत्रांनुसार, शनिवारी विक्रांत रोनाने २५ कोटींची कमाई केली आहे. तिन्ही चित्रपटांचा जागतिक पातळीवर कमाई ८० ते ८५ कोटींपर्यंत झाला आहे. मात्र अधिकृत आकडे समोर आलेले नाही. हे सुरुवातीचा निकाल आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'शमशेरा'शी तुलना केल्यास चित्रपटाने नऊ दिवसांत जगभरातून ६० कोटींची कमाई केली होती. (South Film Industry)

दुसरीकडे अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज' चे एकूण कमाई ८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. विक्रांत रोनाचे आतापर्यंतचे आकडे पाहिल्यास ती चौथ्या आठवड्यात १०० कोटी रुपये पार करु शकते. कन्नड चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'विक्रांत रोना' पहिल्या १० मध्ये आहे.