मोदींमुळेच मला बॉलीवूडमध्ये....अग्निहोत्रींचा मोठा गौप्यस्फोट!|Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri : मोदींमुळेच मला बॉलीवूडमध्ये....अग्निहोत्रींचा मोठा गौप्यस्फोट!

Vivek Agnihotri the kashmir files movie director : काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी सर्वाधिक चर्चेतील आणि वादग्रस्त चित्रपट म्हणून ज्याकडे पाहिले गेल्या त्या द काश्मीर फाईल्सला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं देशभरात खळबळ उडवून दिली होती. राजकीय, सामाजिक वातावरण या चित्रपटानं बदलवून टाकले होते.

विवेक अग्निहोत्रींनी काश्मीर फाईल्सपूर्वीदेखील वेगवेगळ्या विषयांवर मांडणी करत काही प्रभावी कलाकृती तयार केल्या आहेत. मात्र यासगळ्यात चर्चा झाली ती काश्मीर फाईल्सची. त्यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी या कलाकारांचा समावेश होता. बॉक्सऑफिसवर या चित्रपटानं दोनशे कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. ऑस्करच्या शर्यतीतही हा चित्रपट होता.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आता काश्मीर फाईल्सच्या अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा एका वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अग्निहोत्री हे त्यांच्या राजकीय, सामाजिक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. काही दिवसांपासून त्यांचे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यातील वाद समोर आले आहेत. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. अग्निहोत्रींनी आपण काहीही झालं तरी मोदींनाच सपोर्ट करणार असल्याचे सांगत अनेकांना धक्का दिला आहे. आपल्या वक्तव्याचे त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण चर्चेचा विषय आहे.

मला बॉलीवूडमध्ये कुणीही पसंत करत नाही. कुणालाही मी आवडत नाही. कारण मी नेहमीच मोदींना आणि त्यांनी सांगितलेल्या विचारांना फॉलो करतो. आता बॉलीवूडमध्ये मोदींना नेहमीच काहीजणांचा विरोध राहिला आहे. याचे कारण प्रत्येकाच्या लेखी वेगळं आहे. काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अग्निहोत्रींनी त्यांची बाजू मांडली आहे.

यावेळी अग्निहोत्री यांनी शाहरुख खान आणि पठाण यावर देखील आपली बाजू मांडली. ते म्हणाले, शाहरुख हा एक चांगला कलाकार आहे. तो मेहनती कलाकार आहे. प्रतिभावान आहे. पण एक गोष्ट खरी की, बॉलीवूडमधील अनेकांना माझा राग आहे. त्यांना मी आवडत नाही. ते सतत माझ्याविषयी बोलत असतात. याचे कारण मी मोदींविषयी बोलतो, त्यांचे विचार मांडतो. म्हणून हा सगळा राग आहे. मोदींचे समर्थन करतो म्हणून मला विरोध होतो. असे अग्निहोत्रींनी म्हटले आहे.