Sony Marathi:मिहीरच्या फॅमिलीशी आता कसे डील करणार बॉस ? नेमका काय निर्णय घेणार बॉस आजच्या एपिसोडमधे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिहीरच्या फॅमिलीशी आता कसे डील करणार बॉस ?

मिहीरच्या फॅमिलीशी आता कसे डील करणार बॉस ?

'बॉस माझी लाडाची' ही Sony-Marathi वरील मालिका प्रेक्षक आवडीने बघतात.या मालिकेतील भाग्यश्रीच्या रागीट स्वभावच प्रेक्षकांना ही मालिका बघण्यास जास्त प्रभावित करतो.राजेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्रीला फॅमिलीची कन्सेप्टच पटत नाही.कंपनी वाचवण्यासाठी अॅग्रीमेंट बनवत मिहीरशी लग्नाची डील करणाऱ्या बॉसला नेमक्या साखरपूड्याच्या दिवशीच मिहीरच्या फॅमिलीबद्दल कळते.(Marathi Serail)आता मिहीरवर याचे काय परिणाम होतील त्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.

एकीकडे ऑफिसमधे मिहीरच्या एकतर्फी प्रेमात पडलेली बॉसची सेक्रेटरी आणि दुसरीकडे गावात मिहीसोबत लग्नाची स्वप्न बघणारी मुलगी या दोघीच्या कचाट्यात आधीच फसलेला मिहीर.साखरपुड्याच्या दिवशीच अचानक प्रकट झालेल्या आजी आजोबांना मिहीरचे खोटे बोलणे आवडले नाही.मिहीरने समजूत काढल्यावर आजोबांनी जरी साखरपुड्यासाठी होकार दर्शवला असला तरी आजीला मिहीरचे रागीट,फॅमिली नको असलेल्या बॉससोबत लग्न नको आहे.अशा वेळी कसे बसे आजीला शांत करत साखरपुडा करणाऱ्या मिहीर आणि बॉस म्हणजेच राजेश्वरीच्या लग्नाला आजी परवानगी देणार की हे लग्न मोडणार ?

फॅमिलीबद्दल कळल्यावर आज बॉस काय करणार ?

बॉस मिहीरवर चिडणार काय?त्याच्या फॅमिलीबद्दल कळल्यानंतर याचे परिंणाम चांगले नसतील असे कालच्या एपिसोडमधे मिहीरला खणकावल्यानंतर आज बॉस नेमकं काय करणार.नव्या अॅग्रीमेंटमधे आता बॉस मिहीरला नेमक्या कोणत्या नव्या अटी घालणार ?या प्रेक्षकांना पडलेल्या सगळ्या शंकांचं आणि प्रश्नाचं उत्तर त्यांना आजच्या एपिसोडमधे मिळेल की मालिकेत नविन ट्वीस्ट येणार ? बघा आजचा एपिसोड म्हणजे तुम्हालाही कळेल.(Marathi actors)

या मालिकेतील विविध पात्र त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांना ही मालिका बघण्याच्या मोहात पाडतात.आज काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते.

Web Title: What Next Is Going To Happen In Marathi Serial Boss Mazi Ladachi G Actress Bhagyashree

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top