Look Back 2023: यंदाचं वर्ष 'देओल' फॅमिलीचं! लॉर्ड बॉबीच नाही तर तिन्ही पिढ्यांनी केलाय बॉक्स ऑफिसवर धमाका!

2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूप लकी ठरले आहे. कसे ते जाणून घेऊया......
Year Ender 2023 lucky year for deol family animal bobby deol gadar 2 sunny deol dharmendra karan deol wedding
Year Ender 2023 lucky year for deol family animal bobby deol gadar 2 sunny deol dharmendra karan deol wedding Esakal

look back 2023: 2023 हे वर्ष सर्वांसाठीच खुप खास ठरलं. 2023 मध्ये भारताने आपल्या नावावर अनेक पराक्रम केले. चांद्रयान असो किंवा वर्ल्ड कप असो.

मात्र यासोबतच मनोरंजन विश्वातही अनेक घडामोडी घडल्या. ज्यात भारताचे नाव ऑस्करमध्ये गाजलं तर अनेक बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. यंदाचं वर्ष बॉलिवूडने गाजवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पठाण, जवान, गदर2 या चित्रपटांनी 500 कोटींची कमाई केली. त्यातच यंदाच्या वर्षी एका फॅमिलीने सर्व बॉलिवूड डोक्यावर घेतलं ती फॅमिली म्हणजे देओल.

धर्मेंद्र

यंदा सर्वत्र चर्चा झाली ती ८७ वर्षाच्या धर्मेंद्र यांची. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. धर्मेंद्र यांना देओल कुटुंबाची शान म्हटलं जातं. चित्रपटसृष्टीतही त्यांचे नाव अग्रस्थानी होते. धर्मेंद्र यांनी जवळपास 6 दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

धर्मेंद्र यांनी 2023 मध्ये करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून धमाकेदार कमबॅक केले. या चित्रपटात त्यांनी शबाना आझमीसोबत लिपलॉक सीनही दिला होता. ज्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली. या वयातही धर्मेंद्र यांच्या लिपलॉक सीनवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

हेमा मालिनी

बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी या चित्रपटांमध्ये कमी मात्र राजकारणात जास्त सक्रिय आहेत. 2023 मध्ये मीराबाईच्या 525 व्या जयंती सोहळ्यात त्यांनी सादरीकरण केले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी आपल्या शानदार डान्सने सर्वांना आश्चर्यचकित केले.

Year Ender 2023 lucky year for deol family animal bobby deol gadar 2 sunny deol dharmendra karan deol wedding
Country Of Blind Oscar Nominated: हिना खानची आता परदेशातही हवा! 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ची ऑस्करमध्ये एंट्री!

सनी देओल

मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा सनी देओलचा दरारा पहायला मिळाला. जवळपास दोन दशकांनंतर सनी देओल गदरचा सीक्वल घेऊन आला आणि त्याने बॉक्स ऑफिस हादरुन सोडलं. सनी देओलच्या गदर 2 ने बॉक्स ऑफिसवरील सर्वच रेकॉर्ड मोडले.

बंपर कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 ​​कोटींचा आकडा गाठला. सनी पाजीने पुन्हा बॉलिवूडवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आता त्याला आणखी चांगल्या प्रोजेक्ट्सच्या ऑफरही मिळू लागल्या आहेत.

बॉबी देओल

सनी देओल आणि धर्मेंद्र यांनी तर बॉक्स ऑफिसवर दरारा निर्माण केला अन् बॉबीनं वर्षांच्या अखेरीस याला चार चाँद लावले. बॉबी देओलने यापुर्वी जरी आश्रम वेब सीरिजद्वारे पुनरागमन केले असले त्याने 2023 मध्ये 'अॅनिमल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्णाण केली. सध्या सर्वत्र फक्त बॉबी देओलचीच चर्चा आहे. काही मिनीटांची भूमिका असली तरी बॉबीने आपली छाप सोडली.

Year Ender 2023 lucky year for deol family animal bobby deol gadar 2 sunny deol dharmendra karan deol wedding
Namrata Sambherao: "हा निर्णय मी...!" 'कुर्ररर' नाटक सोडल्याचं खरं कारण नम्रताने सांगितलं

राजवीर देओल

धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा धाकटा लेक राजवीर देओल यानेही यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. राजवीर 'दोनो' या चित्रपटात दिसला होता. त्याच्यासोबत पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा मुख्य भूमिकेत दिसली. हा सिनेमा जरी फ्लॉप ठरला तरी राजवीरच्या अभिनयाचे कौतुक झाले.

करण देओल

चित्रपटांव्यतिरिक्त, धर्मेंद्र यांच्या कुटुंबात यावर्षी लग्नाचे वातावरणही होते. धर्मेंद्र यांचा मोठा नातू करण देओलने द्रिशा आचार्यसोबत लग्न केले. हे लग्नही खुप चर्चेत राहिले. त्याचे फोटो अजूनही व्हायरल होत आहे.

Year Ender 2023 lucky year for deol family animal bobby deol gadar 2 sunny deol dharmendra karan deol wedding
Vinamra Bhabal Wedding: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचं थाटामाटात लग्न

केवळ देओल फॅमिलीतील मुलेच नाही तर मुलीही यावर्षी चमकल्या. धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने 2022 मध्ये बऱ्याच वर्षांनी पुनरागमन केले. ती अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील हंटर या वेबसिरीजमध्ये ती दिसली होती. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. आता त्यामुळे यंदा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यात देओल फॅमिलीने 2023 हे वर्ष गाजवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com