गॅस एजन्सीच्या नावाखाली ५६ लाखांची फसवणूक !  

सुषेन जाधव
Monday, 21 September 2020

औरंगाबादेतील व्यापाऱ्याची फसवणूक, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल 

औरंगाबाद : भारत पेट्रोलियमने जानेवारी २०२० मध्ये गॅस एजन्सी देण्यासाठी निवडलेल्या व्यापाऱ्याला भामट्याने लुटले. गॅस एजन्सी देण्यात आल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सॲपवर पाठवून ५६ लाख ६१ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१९) गुन्हा दाखल झाला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
चांगदेव सोमिनाथ तांदळे (सिडको महानगर) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. भारत पेट्रोलियमने गॅस एजन्सी वितरित करण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. त्यानुसार तांदळे यांनी २९ ऑगस्ट रोजी अर्ज भरला होता. त्यानंतर २१ जानेवारी रोजी जळगावच्या कार्यालयात चांगदेव तांदळेंची मुलाखत घेण्यात आली व वाळूज पंढरपूर परिसरात एजन्सी मिळणार असल्याचे भारत पेट्रोलियमने कळवले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर मे २०२० मध्ये संदीप पांडे नावाच्या भामट्याने तांदळे यांना संपर्क केला व www.lpgdistributors.in ही वेबसाईट व लॉगिन आयडी पाठवला. त्याचप्रमाणे तांदळे यांना भारत पेट्रोलियमकडून गोडावून साठी १८ लाख रुपये व गोदाम भाडे व कर्मचाऱ्यांचे वेतन असे मिळून ५० हजार रुपये महिना मिळेल असे सांगितले. विशेष म्हणजे संदीप पांडेने बनावट ओळखपत्र व तांदळे यांना डिलरशिप दिल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सॲपवर पाठवले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा वेळ निघून गेली होती 

६ मे ते जुलै २०२० या काळात ५६ लाख ६१ हजार ७०० रुपये वेगवेगळे कारणे सांगत उकळले. एका आठवड्याने फोन करण्यास सांगितले. तांदळे यांनी ५६ लाख ६१ हजार पांडेने सांगितलेल्या खात्यावर भरल्यानंतर जळगाव येथील भारत पेट्रोलियमच्या कार्यालयात विभागीय व्यवस्थापक अशोक डोंगरे यांची भेट घेऊन वरील रक्कम तुमच्या पांडे नावाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या खात्यात जमा केल्याचे सांगताच डोंगरे यांनी पांडे नावाची कोणतीही व्यक्ती भारत पेट्रोलियममध्ये काम करत नसल्याचा खुलासा केला. तांदळेंना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे करत आहेत 

(Edit-Pratap Awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 56 lakh fraud in gas agency Aurangabad news