अरे बाप रे..! उपासमारीने हजारो मोकाट कुत्र्यांना झालायं हा रोग..! वाचा कोणत्या शहरात वाढला धोका..!  

मधुकर कांबळे
Wednesday, 22 July 2020

आधीच पावसाळ्याचे दिवस, त्यात मोकाट कुत्र्यांना होणारा त्वचारोगाचा संसर्ग यामुळे आजारी कुत्रे पिसाळून ते नागरिकांना चावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास कायम आहे. त्यात दिवसेंदिवस रोगी कुत्र्यांची संख्या वाढत असून, सध्या सुमारे चार हजार कुत्र्यांना त्वचारोगाचा संसर्ग झाला आहे. उपासमारीमुळे हा त्वचारोग होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, आधीच पावसाळ्याचे दिवस, त्यात मोकाट कुत्र्यांना होणारा त्वचारोगाचा संसर्ग यामुळे आजारी कुत्रे पिसाळून ते नागरिकांना चावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न काही वर्षांपासून गाजत आहे. कुत्रा चावल्याने अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या ३५ ते ४० हजारांवर गेल्याचे महापालिकेचे अधिकारीच सांगतात. लॉकडाउनच्या काळात तर रस्त्याने माणसे कमी आणि मोकाट कुत्रेच जास्त दिसत होती. त्यात आता त्वचारोगामुळे कुत्र्यांच्या अंगावरचे केस गेले असून ते अशक्त दिसत आहेत. गल्लोगल्ली अशा कुत्र्यांची संख्या वाढली असून ते दिसेल त्या घरात घुसत आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

जिल्हा परिषदेतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, की कोरोनामुळे गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून लॉकडाउन होते. कुत्र्यांचा आहार मांसाहार आहे. या काळात मटण, चिकनची दुकाने बंद होती. त्यांना मांस, हाडे खायला मिळत नसल्याने त्यांना मिळणारे कॅल्शियम व इतर आवश्‍यक घटक कमी झाल्याने उपासमारीने अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे त्यांना झालेल्या त्वचारोगाची साथ पसरत आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

शहरात साठ हजार भटकी कुत्री 
गेल्या दोन वर्षांपासून खासगी एजन्सीच्या माध्यमातून कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात आहे; मात्र कुत्र्यांची संख्या व शस्त्रक्रियेचे प्रमाण पाहता संख्या नियंत्रणात येऊच शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शहरात ६० हजार भटके कुत्रे असून त्यापैकी जवळपास १५ टक्के कुत्र्यांना त्वचारोग झाला आहे. रोगाने त्रस्त असलेले कुत्रे माणसांवर हल्ला करण्याची शक्‍यता जास्त असते. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले, की महापालिकेने गेल्या ऑक्‍टोबरमध्ये ४७२ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. त्वचारोग झालेल्या कुत्र्यांची माहिती नागरिकांनी महापालिकेला कळवावी. त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. जे कुत्रे बरे होऊ शकणार नाहीत, त्यांच्याबाबत समितीमध्ये निर्णय घेऊन दयामरण दिले जाईल. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कुत्र्यांना गरज शेल्टर हाऊसची 
तज्ज्ञांच्या मते, महापालिकेने मोकाट कुत्र्यांसाठी झोननिहाय एक शेल्टर हाऊस तयार केले पाहिजे. आजारी, रोगग्रस्त कुत्र्यांवर या ठिकाणी उपचार करून ते बरे झाल्यानंतर त्यांना सोडून दिले पाहिजे; मात्र महापालिकेचे असे कुठेच शेल्टर हाऊस नाही. महापालिकेच्या लेखी पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे दुर्लक्षित आहे; तसेच मोकाट कुत्र्यांचा मृत्यू झाला तर त्याला उघड्यावर फेकून दिले जाते. त्यामुळे शहरात कुत्र्यांसाठी दफनभूमी करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.  

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

चावा घेतल्याने होतात जखमा 
नुकताच श्रावण महिना लागला आहे. त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो. या काळात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरते. आधीच त्वचारोग झाल्याने त्यात मोकाट कुत्र्यांचे भांडण होतात. त्यात एकमेकाला चावा घेतला की त्यांना जखमा होतात. त्यामुळे जखमा झालेली कुत्रे पिसाळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

(संपादन - प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad city Diseases of Mokat dogs