औरंगाबाद : सिरो सर्वेक्षण अहवालाकडे लागली नजर

मधुकर कांबळे
Sunday, 23 August 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि अ‍ॅण्टिबॉडी तपासण्यासाठी शहरासह जिल्हाभरात सिरो सर्वेक्षण राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व अ‍ॅण्टिबॉडी तपासण्याकरिता महापालिका, घाटी, एमजीएम रुग्णालय आणि भारतीय जैन संघटना यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात सोमवार ( ता.१०) पासून पाच दिवस सिरो सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

यात ४ हजार ५५० नागरीकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या सिरो सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी (ता.२४) मिळणार आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या अहवालातून शहरात कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता किती यांचा अंदाज लागणार आहे. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि अ‍ॅण्टिबॉडी तपासण्यासाठी शहरासह जिल्हाभरात सिरो सर्वेक्षण राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार महापालिका, घाटी रुग्णालय, एमजीएम आणि भारतीय जैन संघटेनेच्या संयुक्त विद्यमाने १० ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरात सिरो सर्वेक्षण करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

११५ वॉर्डातील झोपडपट्टयांमधून १ हजार ५४९ आणि उर्वरीत अन्य सधन वसाहतींमधून ३ हजार १ या अशा ४ हजार ५५० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या रक्ताच्या नमुन्यांची घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत डॉ. ज्योती बजाज यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. यानंतर डॉ. दिक्षित यांनी विश्लेषण करुन अ‍ॅण्टिबॉडीचा अहवाल तयार करून सोमवारी ( ता. २४ ) करतील. उद्या २४ रोजी सिरो सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona news Siro report waiting