Aurangabad corona : दहा हजाराचा टप्पा पार; आज सकाळच्या सत्रात ८४ रुग्ण पॉझिटिव्ह, आता ३९१८ जणांवर उपचार 

corona1.jpg
corona1.jpg

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. बाधितांचा आकडा हा दहा हजाराच्या पुढे गेला आहे. शनिवारी (ता.१८) जिल्ह्यात सकाळी ८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १० हजार १६६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५८६१ बरे झाले, ३८७ जणांचा मृत्यू झाला. तर ३ हजार ९१८ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाची वाढती संख्या तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दहा ते अठरा जुलै दरम्यान शहरात लॉकडाऊन केला. याच बरोबर ॲटीजन्स टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे जास्तीत जास्त रुग्णांची टेस्ट या काळात करण्यात आली. परिणामी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका 
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (१२)

सादात नगर (१), पुंडलिक नगर (१), चिकलठाणा (१), संजय नगर (१), हिमायत बाग (१), पद्मपुरा (१), क्रांती नगर (१), मिल कॉर्नर (१), अमृतसाई प्लाजा (१), छावणी परिसर (१), छत्रपती नगर, सातारा परिसर (१), अन्य (१) यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण (६७)

कन्नड (१), इंदिरा नगर, गोंदेगाव (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (२), राधेय सो., बजाज नगर (७), महालक्ष्मी सो., बजाज नगर (१), छावा सो., बजाज नगर (३), सिडको महानगर (४), वाळूज, बजाज नगर (५), स्वस्तिक नगर (१), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (१), बजाज नगर (१), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (४), न्यू संजिवनी सो., बजाज नगर (१), गजानन सो., बजाज नगर (१), जिजामाता सो., बजाज नगर (१), ओमशक्ती सो., बजाज नगर (१), बकवाल नगर, नायगाव (१), अविनाश कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (१), अजिंक्यतारा सो., शिवाजी नगर, वाळूज (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), सरस्वती सो., (१), जागृत हनुमान मंदिर परिसर (१), शिवकृपा सो., बजाज नगर (१), ओमसाई नगर,रांजणगाव (१), स्नेहांकित सो., बजाज नगर (३), मोहटा मंदिराजवळ, बजाज नगर (१), शिवनेरी सो., बजाज नगर (१), मयूर पार्क (१), बजाज विहार (२), अक्षर सो., बजाज नगर (१), रांजणगाव, गंगापूर (३), भानुदास नगर, गंगापूर (२), वैजापूर (८) यांचा समावेश आहे.

सिटी एंट्री पाँइटवरील रुग्ण (५)
बजाज नगर (१), जाधववाडी (२), कांचनवाडी (१), वडगाव (१)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना मीटर

  • बरे झालेले-५८६१
  • उपचार सुरू -३९१८
  • मृत्यू----३८७
  • एकूण रुग्ण- १०१६६

(संपादन : प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com