CORONA UPDATE : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात आढळले १०१ पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

मनोज साखरे 
Thursday, 23 July 2020

आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार १२६ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ६९० बरे झाले असून ४१७ जणांचा मृत्यू झाला. आता ५ हजार १९ जणांवर उपचार सुरु आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील चार कोरोनाबाधितांचा समावेश आहे.  

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चहुबाजूने पसरलेला असून निष्काळजीमुळे बाधितांची संख्या वाढतच असून आज (ता. २३) १०१ रुग्णांचे अहवाल सकाळच्या सत्रात पॉझिटिव्ह आले. कालनंतर आता आणखी तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार १२६ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ६९० बरे झाले असून ४१७ जणांचा मृत्यू झाला. आता ५ हजार १९ जणांवर उपचार सुरु आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील चार कोरोनाबाधितांचा समावेश आहे.  

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहरातील बाधित ८० रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :

 विठ्ठल नगर (२), गांधी नगर (१०), दलालवाडी (२), राम नगर (६), सावित्री नगर, हर्सुल (६), कुंभार गल्ली, हर्सुल (१), पडेगाव (४), स्वामी विवेकानंद नगर (३), कैसर कॉलनी (२), टाइम्स कॉलनी (१), अविष्कार कॉलनी, एन सहा (१), पुंडलिक नगर (१), छावणी (१), पद्मपुरा (१), क्रांती नगर (१), बन्सीलाल नगर (४), बनेवाडी (३), छावणी (१), मयूर पार्क (१), उस्मानपुरा (१), शिवशंकर कॉलनी (५), गुलमोहर कॉलनी, एन पाच (२), विश्व भारती कॉलनी (२), हनुमान नगर, गल्ली नं. पाच (१), विष्णू नगर (१), ठाकरे नगर, एन दोन सिडको (२), एन दोन, जिजामाता कॉलनी (१), बालाजी नगर (२), एसआरपीएफ परिसर (१), हिमायत बाग परिसर (२), जवाहर कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), गणेश नगर (१), एसबी मुलांचे वसतिगृह परिसर (१), दर्गा रोड परिसर (१), देवगिरी नगर, सिडको (२), अन्य (२)

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

ग्रामीण भागातील बाधित १७ रुग्ण

कन्नड (१), साराभूमी परिसर, बजाज नगर (२), वडगाव, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी (१), राजवाडा, गंगापूर (२), इंदिरा नगर, वैजापूर (१), इंगळे वस्ती, वैजापूर (१), घायगाव (१), परदेशी गल्ली, वैजापूर (१), कमलापूर (१), अंभई (१), प्रसाद नगर, सिल्लोड (१), रांजणगाव (२)

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (४)
छावणी (१), अन्य (३)

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील ६४ वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात वंजारवाडीतील ७० वर्षीय स्त्री आणि ८० वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ६६९०
  • उपचार घेणारे       -  ५०१९
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४१७
  • एकूण बाधित        - १२१२६

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 101 positive increase