CORONAVIRUS : औरंगाबादेत संसर्गाच्या वेगाला चाप बसता बसेना, आज २०६ बाधित रुग्ण,

मनोज साखरे
Thursday, 2 July 2020

आजच्या एकूण बाधितांमध्ये १२२ पुरूष आणि  ८३ महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत एकूण ५ हजार ९८८ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण  २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ८६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्टच होत असून संसर्गाच्या वेगाला चाप बसता बसेना. आज (ता.२) सकाळच्या सत्रात जिल्ह्यात २०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील १७१ आणि ग्रामीण भागातील ३५ बाधित रुग्ण आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
आजच्या एकूण बाधितांमध्ये १२२ पुरूष आणि  ८३ महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत एकूण ५ हजार ९८८ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण  २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ८६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घेण्यात आलेल्या   १ हजार २०० स्वँबपैकी २०६ अहवाल पॉझिटिव्ह  आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

आज आढळलेले शहरातील १७१ बाधित रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) -

सिडको (१), गजानन नगर, गारखेडा (१), काबरा नगर, गारखेडा (१), फुले नगर, उस्मानपुरा (१), नारळीबाग (२), पुंडलिक नगर (४), सिडको एन-अकरा (३), मिसरवाडी (२), शिवाजी नगर (६), सुरेवाडी (१), जाधववाडी (५), सातारा परिसर (३), छावणी (५), द्वारकापुरी, एकनाथ नगर (६), आयोध्या नगर (२), नवनाथ नगर (१),  रायगड नगर (२), उल्कानगरी (१), शिवशंकर कॉलनी (१०), एन बारा टी व्ही सेंटर (३), पोलिस कॉलनी, पडेगाव (५),बेगमपुरा (१), मेडिकल क्वार्टर परिसर (१), रवींद्र नगर (२), पडेगाव (२), बायजीपुरा (३), समता नगर (१), मयूर पार्क (१), नागेश्वरवाडी (१), रोकडिया हनुमान कॉलनी (१), कृष्णा नगर, बीड बायपास (१), ज्योती नगर (१), एन सात सिडको, बजरंग चौक (२), हनुमान नगर (७), उस्मानपुरा (२), भोईवाडा (२), बन्सीलाल नगर (१), कुंभारवाडा (२), रमा नगर (१), शांतीनिकेतन कॉलनी (१), भाग्य नगर (१०), सौजन्य नगर (१), कांचनवाडी (१३), नाथ नगर (३), राहुल नगर (६), देवळाई परिसर (१),हायकोर्ट परिसर (१), राम नगर (१), नवजीवन कॉलनी (१), अल्तमश कॉलनी (१), ठाकरे नगर (३), एन दोन सिडको (१), एन सहा सिडको (२), सावंगी हॉस्पीटल परिसर (१), सावंगी, हर्सुल (२), न्याय नगर (१), एन नऊ सिडको (२), विशाल नगर (३), एसटी कॉलनी (६), सेव्हन हिल (१), गांधी नगर (२), गुरु सहानी नगर (१), टीव्ही सेंटर (१), सदाशिव नगर (१), एकनाथ नगर (१), खोकडपुरा (१), मुकुंदवाडी (१), द्वारकानगरी, एन अकरा (१), एन बारा, हडको (२), नूतन कॉलनी (१), अन्य (१)

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

आज ग्रामीण भागात आढळलेले ३५ रुग्ण

शिवाजी नगर, वाळूज (१), शरणापूर (२), चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर (३), सिडको महानगर (२), कमलापूर, बजाज नगर (१), जीएम नगर, रांजणगाव (१), एसटी कॉलनी, बजाज नगर (१), पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), आयोध्या नगर, बजाज नगर (१), अनिकेत सो., बजाज नगर (१), चिंचबन कॉलनी (१), नागापूर कन्नड (१) कोहिनूर कॉलनी (१), गंगापूर माळूंजा (१), वाळूज गंगापूर (३), अरब गल्ली गंगापूर (३), दर्गाबेस वैजापूर (१०) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर
सुटी झालेले रुग्ण    - २८५७
उपचार घेणारे रुग्ण - २८६०
एकूण मृत्यू             - २७१
--------------------------------------
आतापर्यंतचे बाधित  - ५९८८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 206 positive increase