CORONAVIRUS : औरंगाबादेत आज सकाळी ३६ बाधित, जिल्ह्यात ४ हजार ३०२ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Monday, 20 July 2020

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या १० हजार ८३९ एवढी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार १४१ एवढी आहे. आजपर्यंत एकूण ३९६ जणांचा मृत्यू झाले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद : औरंगाबादेत काल एकाच दिवसात ३९९ जण कोरोना बाधित आढळल्यानंतर आज (ता. २०) सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यातील ४ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या १० हजार ८३९ एवढी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार १४१ एवढी आहे. आजपर्यंत एकूण ३९६ जणांचा मृत्यू झाले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

रुग्णांचा तपशील   

औरंगाबाद शहरातील रुग्ण (६)
जामा मस्जिद परिसर (१), लक्ष्मी नगर (२), देवगिरी कॉलनी (१), राजीव गांधी नगर (१), गुरूदत्त नगर गारखेडा (१), या भागातील रुग्ण आहेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
ग्रामीण भागातील रुग्ण (१९)
बकवाल नगर वाळुज (१),  पाचोड (१),  साबणे टॉकीज परिसर, गंगापुर (५), लासुर स्टेशन (१),  शिरसगांव (१), मेहबुब खेडा (१),  रेणुका नगर, अजिंठा (१),  आंबेडकर नगर, वैजापुर (१),  गोल्डन नगर वैजापुर (१),  एनएमसी कॉलनी वैजापुर (१),  वैजापुर (५),   या भागातील रुग्ण आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

चेक पोस्ट वरील रुग्णसंख्या (११)
सुधाकर नगर (१),   मिटमिटा (३),  जाधववाडी (२),   सिध्दार्थ नगर (१),  हर्सुल (१),   बालाजी नगर (१), बजाजनगर (२),  या भागातील रुग्ण  आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण -६१४१
उपचार घेणारे रुग्ण -४३०२
एकूण मृत्यू - ३९६
आतापर्यंत एकूण बाधित-१०८३९

(संपादन : प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona update today 36 new positive patient