Corona Update : औरंगाबादेत आज ७१ रुग्णांची वाढ; आणखी चौघांचा मृत्यू

मनोज साखरे
Wednesday, 29 July 2020

आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार४४०  कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९ हजार ३३८ बरे झाले असून ४६२ जणांचा मृत्यू झाला. आता ३ हजार ६४० जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग कमी झाल्याची चिन्हे असून आज (ता. २९) सकाळच्या सत्रात ७१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच चार कोरोनाबधितांचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार४४०  कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९ हजार ३३८ बरे झाले असून ४६२ जणांचा मृत्यू झाला. आता ३ हजार ६४० जणांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ३८ रुग्णांचा आज बाधित रुग्णात समावेश आहे.  

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम  

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण 
पाचोड,पैठण (२), नूतन कॉलनी, गंगापूर (१), औरंगाबाद (९), फुलंब्री (१), सिल्लोड (२), वैजापूर (१५), पैठण (७), सोयगाव (४) 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहरातील बाधित रुग्ण 
बैजिलाल नगर (१), सिडको परिसर (१), मुकुंदवाडी (१), जवाहर कॉलनी (१) पंचशील नगर (२), रोशन सो., गारखेडा (१), उल्कानगरी (४), एन सहा सिडको (६), संघर्ष नगर, मुकुंदवाडी (३), सिद्धार्थ नगर (५), गवळीपुरा (१), राम नगर (१), एन सात, अयोध्या नगर (१), गारखेडा परिसर (२)

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

चार कोरोनबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण    -  ९३३८
उपचार घेणारे       -  ३६४०
आतापर्यंतचे मृत्यू  - ४६२
एकूण बाधित        - १३४४०

Edited by pratap awachar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update today 71 positive increase and four person corona death