esakal | Corona Update : औरंगाबादेत ६६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४५ हजार ९५५ कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Update

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Corona Update : औरंगाबादेत ६६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४५ हजार ९५५ कोरोनामुक्त 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.११) ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ४५८ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार २४३ जणांचा मृत्यू झाला. सध्या २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४९ जणांना सुटी झाली. यात शहरातील ४१ व ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४५ हजार ९५५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

शेतकरी बापाचा विश्वास लेकीने जिंकला, उपसरपंचपदी झाली बिनविरोध निवड


शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : सातारा परिसर (३), दत्त नगर, बीड बायपास (१), उल्कानगरी (१), जाधववाडी, हर्सुल (१), मेल्ट्रॉन हॉस्पीटल परिसर (१), वेदांत नगर (१), भगतसिंग नगर, गारखेडा (१), बीड बायपास (२), मोरेश्वर सो. (१), होनाजी नगर (१), नारायण पुष्प सो. (१), एन सहा (१), एन सात (१), एन दोन म्हाडा कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (१), एन चार सिडको (१), कांचनवाडी (१), मुकुंदवाडी (१), एन नऊ एम दोन (१), अन्य (३५) 

भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकरांसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन 


ग्रामीण भागातील बाधित : चित्तेगाव (१), पैठण (१), अन्य (७) 

दोघांचे मृत्यू
औरंगाबादेत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात पानवडोद (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील ७६ वर्षीय पुरुषाचा दहा फेब्रुवारीला रात्री साडे दहाला मृत्यू झाला. गुलमंडी, औरंगाबादेतील ५९ वर्षीय पुरुषाचा आज (ता. ११) पहाटे सातच्या सुमारास मृत्यू झाला. 

 क्लिक करुन औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण - ४५९५५ 
उपचार घेणारे रुग्ण - २६० 
एकुण मृत्यू - १२४३ 
------- 
आतापर्यंतचे बाधित : ४७४५८