
गुप्त मतदान पद्धतीने राजधर प्रकाश अहिरे यांना आठ मते मिळून ते विजयी झाले तर नाना देवराम अहिरे यांना सात मतदान मिळाली.
नागद (जि.औरंगाबाद) : नागद (ता.कन्नड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजधर अहिरे, तर उपसरपंचपदी गीताबाई महाजन यांची निवड सोमवारी (ता.आठ) झाली. यावेळी सरपंच व उपसरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्यानंतर गुप्त मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी माजी आमदार नितीन पाटील व डॉ.दिलीपसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आदर्श परिवर्तन विकास पॅनलच्या आठ जागा निवडून आले होते.
मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'
तसेच आमदार उदयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वा खालील जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या पाच जागा निवडून आले होत्या. नागद ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या पांगारा येथील दोन जागा अपक्ष निवडून आल्या होत्या. या दोन अपक्ष सदस्यांना आमदार राजपूत गटाने ऐन वेळी आपल्या बरोबर घेऊन आज अर्ज दाखल केले.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांची मोठी कारवाई, वाळूतस्करांचे धाबे दणाणले
माजी आमदार नितीन पाटील व डॉ.दिलीपसिंग राजपूत गटाकडून सरपंचपदासाठी राजधर प्रकाश अहिरे व उपसरपंच पदासाठी गीताबाई जयरमसिंग महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार राजपूत गटाकडून सरपंचपदासाठी नाना देवराम अहिरे व उपसरपंचपदासाठी अपक्ष म्हणून निवडून आलेले मदनसिंग रुपसिंग लोदवाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
पत्नी संजनाने मारली बाजी, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘किंग मेकर’ची भूमिका फोल
यावेळी गुप्त मतदान पद्धतीने राजधर प्रकाश अहिरे यांना आठ मते मिळून ते विजयी झाले तर नाना देवराम अहिरे यांना सात मतदान मिळाली. त्यांचा एक मताने पराभव झाला. तसेच उपसरपंचपदासाठी गीताबाई महाजन यांना आठ मते मिळून त्या विजयी झाल्या व मदनसिंग रुपसिंग लोदवाळ यांना सहा मते मिळाली व एक मतपत्रिका कोरी निघाली त्यामुळे त्यांचा पराभव झाला. या वेळी ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले पंधरा सदस्य उपस्थित होते.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून आर.एम.बेंबरे, कृषी अधिकारी पंचायत समिती कन्नड सचिव म्हणून ए.बी.गोरडे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी व्ही.ए. मोतिंगे, ग्रामपंचायतचे लिपिक जयसिंग राजपूत, रवींद्र राजपूत, कोतवाल शेख इसाक यांनी त्यांना मदत केली. पोलिस बंदोबस्त जमादार पंढरीनाथ इंगळे व पोलीस पाटील दीपक कोळी यांनी केला.
निवड प्रक्रियेत नितीन पाटील गटाचा विजयी घोषित झाल्यानंतर माजी आमदार नितीन पाटील यांचे चिरंजीव अर्जुन पाटील, डॉ.दिलीपसिंग राजपूत यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार करून विजय साजरा करण्यात आला. यावेळी अशोक पाटील, सुभाष महाजन, भगवान ठाकरे, राजेश पाटील, बबलू पाटील, भोला महाजन, रितेश मोरे, अजित महाजन, जितेंद्र हजारी, भाऊसाहेब आहिरे, शाहू महिरे, आप्पा कारभारी, विजय पाटील, गिरधर तेवर, राजू गोठवाळ, राजू पाटील आदींनी फटाके फोडून तसेच गुलाल उधळून व पेढे वाटून विजय साजरा केला. अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर