औरंगाबाद : आघाडी सरकार काय म्हणते.. दुधाला दरवाढ नाही म्हणते...

प्रकाश बनकर
Saturday, 1 August 2020

  • शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक 
  • म्हणून शेतकरी आत्महत्या करतो - आ. अतुल सावे 
  • महाएल्गार आंदोलनात फिजिकल डिस्टन्स फज्जा 

औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांची म्हैस काय म्हणते, दुधाला दरवाढ नाही म्हणते, आघाडी सरकार काय म्हणते..दुधाला दरवाढ नाही म्हणते, आघाडी सरकारने केली.., शेतकऱ्यांची बिघाडी...!  अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने दूध डेअरी चौकात दूध दरवाढ विरोधात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक 

गायीच्या दुधाला १० रुपये दरवाढ देण्यात यावी, दूध पावडर साठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शहरातील दूध डेअरी चौकात करण्यात आलेल्या एल्गार आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून भाजपच्या वतीने एल्गार करण्यात आला. तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

म्हणून शेतकरी आत्महत्या करतो - आ. अतुल सावे 
सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. दुधाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे. असा आरोप आमदार अतुल सावे यांनी यावेळी केला. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

फिजिकल डिस्टन्स फज्जा 
आंदोलनात घोषणा देते वेळी आणि ठिकाणी मास्क काढले होते. या आंदोलनात आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अदवंत, सविताताई कुलकर्णी, दिव्या मराठे, कचरू घोडके, संजय जोशी, बसवराज मंगरुळे, राज वानखेडे, समीर राजूरकर, बालाजी मुंडे, शिवाजी दांडगे, मनोज पांगारकर, अल्पसंख्यांक मोर्चाप्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख, जालिंदर शेंडगे उपस्थित होते. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

संपादन- प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Milk price hike movement