औरंगाबादेत आणखी तीनजण कोरोनाचे बळी,  एकूण 58 मृत्यू

File Photo
File Photo

औरंगाबाद : कोरोना आणि इतर आजाराने औरंगाबाद शहरातील बळींची संख्या वाढतच असून जयभीमनगर आणि जाधववाडी आणि महेमूदपुरा येथील कोरोनाबाधित जेष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. मृत महेमूदपुरा येथील महिला रुग्ण  खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.  अशी मााहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. 26) दिली आहे.  आतापर्यंतची औरंगाबादेत कोरोनाचे 58 बळी  गेले आहेत. 

जयभीमनगर येथील 72 वर्षीय जेष्ठ नागरिकाला  जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. त्यांचा कोविड अहवाल 24 मे रोजी  अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत घाटीत भरती करण्यात आले. त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब होता.  त्यांना कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आले. त्यांचा 26 मे रोजी दोनच्या  सुमारास  मृत्यू झाला.

जाधववाडी येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाला १८ मे रोजी घाटीच्या कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. 19 मे रोजी त्यांचा कोविड अहवाल 
 पॉझिटिव्ह आला. त्यांना छाती आणि मेंदूचा क्षयरोग होता. सोमवारी मध्यरात्री  त्यांचा मृत्यू झाला. 

महेमूदपूर येथील 44 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा खासगी रुग्णालयात सोमवारी (ता. 25) मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आणि इतर व्याधी होत्या. त्यांना 28 एप्रिलला रुग्णालयात भरती केले होते. त्यांची कोरोनाचाचणी 29 एप्रिलला पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. 

जिल्ह्यात आता  कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 327 
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) -

जुना मोंढा (1),  बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4),  जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 11 महिला आणि 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीतून 13 जण, केअर सेंटरमधून 89 जण बरे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गोगा बाबा मंदिर, उस्मानपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, अक्सा मस्जिद, बारी कॉलनी, शहा बाजार, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील आहेत.  

तसेच महापालिकेच्या कोविड केअर केंद्रातून सोमवारी (ता. 25) एकूण 89 कोरोनाबाधितांना ते बरे झाल्याने सुटी देण्यात आली.सोमवारी 102 जण बरे झाले असून एकूण 721 जण बरे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com