औरंगाबाद : दुचाकी-आयशरची धडक, चालक जागीच ठार; संतप्त जमावाने पेटविला आयशर 

शेख मुनाफ
Thursday, 3 September 2020

दाभरुळ शिवारातील घटना.

आडुळ (औरंगाबाद) : भरधाव आयशर ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने दुचाकीला उडविणारया आयशर ला औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ फाटा (ता.पैठण) येथे आडवुन आयशर पेटवुन दिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आयशरला लागलेली आग विजविण्याचा पर्यंत केला. मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

रामनाथ सांडु बमनावत (वय ३८ वर्षे), राहणार निहालसिंग वाडी ता. अंबड है दुचाकी क्रमांक एमएच २० एसी ०७४९ ने दैनंदिन कामे आटोपुन दाभरुळ फाट्याकडुन गावी निहालसिंग वाडी येथे जात होते. नेमके त्यावेळी अंबडकडून भरधाव वेगाने येणारा आयशर क्रमांक एमएच २० सीटी २१९८ हा कपाशीच्या गाठी (रोल) वाहतूक करणारया आयशरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार रामसिंग बमनावत हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच जमावाने आयशरचा पाठलाग करुन आयशरला दाभरुळ फाटा येथे आडवुन पेटवुन दिले. आयशर मध्ये कापशीच्या गाठी असल्याने आयशरने मोठा पेट घेतला. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे गोरखनाथ कनसे, नुसरत शेख, जीवन गुढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेट घेतलेल्या आयशरची आग विझविण्याचा पर्यंत केला मात्र आग विझविण्यात यश येत नव्हते. त्यामुळे त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण करुन आग आटोक्यात आणली. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.. 

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन   

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news Two-wheeler-Eicher accident