लॉकडाऊनच्या काळातही सातारा देवळाईसाठी मिळाला एवढा निधी, वाचा सविस्तर..! 

sirsat.jpg
sirsat.jpg
Updated on

औरंगाबाद : कोरोनामुळे आलेल्या महामारीच्या काळात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. ३ जून पासून काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळातही विकास कामांबद्दल शासन सक्रीय होते. या काळात नगरविकास खात्याने तब्बल ४५ कोटींची कामे मंजूर केली. त्यातील पंचेवीस कोटींची कामे सातारा-देवळाई भागासाठी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शनीवारी (ता.चार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्यांनी सांगीतले की, लॉकडाऊन असले तरी शासकीय, प्रशासकीय यंत्रणा काम करत होती. प्रत्येक मतदारसंघातील विकास कामांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बारकाईने लक्ष होते, कोणत्याही मतदार संघातील कामे थांबू नयेत अशी त्यांची भूमिका त्या काळात होती. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळातही नगरविकास विभागाकडून ४५ कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे, त्यापैकी २५ कोटी रूपयांची कामे सातारा – देवळाईसाठी मंजूर झाली आहेत.

सातारा - देवळाईचा समावेश औरंगाबाद महापालिकेत झाला, त्यामुळे महापालिकेची हद्दवाढ झाली. हद्दवाढीमध्ये विकास कामे करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडून विशेष निधी दिला जातो. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढ या शिर्षकाखाली सातारा देवळाईसाठी २५ कोटी रुपये मंजूर केली आहेत. यातून ड्रेनेज आणि रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या वेळी सातारा - देवळाई भागातील नागरिकांनी विकास कामांबद्दल नाराजी व्यक्त केली होती, सिडकोकडून रस्त्यांच्या कामासाठी ८ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता, मात्र या निधीतून ज्या गतीने काम होणे अपेक्षित होते त्या गतीने काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष होता. आता रस्त्यांची कामे महापालिकेच्या नव्हे तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून केली जातील असे ते म्हणाले. त्यासाठी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेतले आहे असा उल्लेख त्यांनी केला. रस्त्यांच्या कामांची निविदा येत्या काही दिवसात निघणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय शरणापूरच्या रस्त्यासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे असा उल्लेख त्यांनी केला. बीड बायपास रस्त्याचे काम देखील पंधरा दिवसात सुरु होईल असे आमदार श्री. शिरसाट यांनी सांगीतले. 


विशेष निधीमधून सातारा-  देवळाईत हे कामे होणार 

सातारा येथील मीनाताई ठाकरे नगर, अहिल्याबाई होळकर चोक, लक्ष्मी कॉलनी, बजाज हॉस्पिटलमागील ओंकार बालवाडी, आयप्पा मंदिर ते महाराणा प्रताप चोक, राजेश नगर, भारत माता कॉलनी, गंगा गोदावरी लॉन पासून परमार व्हॅली या भागातील कामे सुरू असून काही कामे प्रगतीपथावर आहे ती कामे लवकर पूर्ण होणार आहेत. 

तसेच हरिराम नगर, नाईक नगर, साईनाथ नगर, विजय नगर, अलोक नगर, गणपती मंदिर ते ओबेरॉय नगर प्रयन्त, सुर्यदिप नगर, गणपती बाग ते सरकारी नाल्यावरील पूल, ओबेरॉय नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रोहिदास नगर, संभाजी चोक, रेणुका माता मंदिर ते हरीसाई पार्क, डीलक्स पार्क, सत्कर्म नगर, छत्रपती नगर, साई समर्थ रेसिडेन्सी ते हरिओम नगरी, मदनी नगर, अरुणोदय कॉलनी, महूनगर व यासह शहर व ग्रामीण भागामध्ये भूमिगत गटार ड्रेनेज लाईन, उद्याने सुशोभिकरणं, सिमेंट क्रॉक्रीट रस्ते, पूल इत्यादी विविध विकास कामे प्रामुख्याने लवकरच सुरू होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com