औरंगाबादेत आज ४२५ जण पॉझिटिव्ह, ९ मृत्यू 

Tuesday, 21 July 2020

जिल्ह्यात आज १९७ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १६४ व ग्रामीण भागातील ३३ जण आहेत. आज दुपारनंतर २२६ रुग्णांची वाढ झाली. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३८, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाच्या तपासणीत १४९, ग्रामीण भागात ३१ व जिल्हा रुग्णालयात स्वॅब देणाऱ्या दोन रुग्णांचा समावेश आहे. 

औरंगाबाद : औरंगाबादेत सोमवारी एकाच दिवशी ४३८ जण बाधित झाल्यानंतर आज (ता. २१) जिल्ह्यातील ४२५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३३७ व ग्रामीण भागातील ८८ जणांचा समावेश आहे. आता ४ हजार ७६० जणांवर उपचार सुरु आहेत. 

आतापर्यंत ११ हजार ६६६ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ४९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४०९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यात देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) व परभणी येथील रुग्णांचाही समावेश आहे. 

जिल्ह्यात आज १९७ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १६४ व ग्रामीण भागातील ३३ जण आहेत. आज दुपारनंतर २२६ रुग्णांची वाढ झाली. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३८, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाच्या तपासणीत १४९, ग्रामीण भागात ३१ व जिल्हा रुग्णालयात स्वॅब देणाऱ्या दोन रुग्णांचा समावेश आहे. 
-- 
कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण - ६४९७ 
उपचार घेणारे - ४७६० 
आतापर्यंतचे मृत्यू - ४०९ 
----- 
एकूण बाधित - ११६६६ 
----- 

औरंगाबादेत नऊ कोरोना बाधीतांचा मृत्यू 

औरंगाबादेत नऊ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. यात देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) व परभणी येथील दोन पुरुषांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकुण ४०९ जणांचा बळी गेला आहे. 

न्यायनगर, गारखेडा येथील ५१ वर्षीय महिलेला १२ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १३ जुलैला पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २० जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधी होत्या. 

हेही वाचा: पठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ

पडेगाव येथील ८३ वर्षीय पुरुषाला ३ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २० जुलैला मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता. 

चेतनानगर, हर्सुल येथील ७० वर्षीय महिलेला १६ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १७ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा २० जुलैला रात्री नऊच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता. 

हेही वाचा:औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील ६५ वर्षीय महिलेला १७ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १८ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा १९ जुलैला सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास मृत्यू झाला. 

श्रेय नगर येथील ४८ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
जैन मंदीर येथील ६२ वर्षीय पुरुषाला १७ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १६ जुलैलाच पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २१ जुलैला सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. 

सादातनगर येथील ४५ वर्षीय पुरुषाला १७ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १८ जुलैला पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २० जुलैला रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. 

देऊळगावराजा, परभणी येथील दोघांचे मृत्यू 
सिव्हील कॉलनी, देऊळगावराजा (जि. बुलढाणा) येथील ३८ वर्षीय पुरुषाला २० जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २० जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. 

परभणी येथील ४४ वर्षीय पुरुषाला १९ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २० जुलैला पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा २१ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब व किडनी विकार होता. 

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

हेही वाचा: Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aurangabad Today 425 People Tested Positive And 9 Died