धक्कादायक! औरंगाबादेत १८४ व्यापारी कोरोनाबाधीत!, आज उच्चांकी ३९९ जण पॉझिटीव्ह

Sunday, 19 July 2020

औरंगाबादेत भाजी विक्रेते, किराणा दुकानांसह इतर दुकानदारांचीही कोवीड चाचणी घेतली जात आहे. यात घेण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या अँटीजेन टेस्टमध्ये तब्बल १८४ जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. ही माहिती महापालिका आयुक्तांनी व्टिट करुन दिली. 

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन शिथील करण्यात आला असुन या काळात २ हजार ७३२ जण बाधीत निघाले. आजही (ता. १९) जिल्ह्यातील आणखी ३९९ नागरिक कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला. धक्कादायक म्हणजे १८४ व्यापारी कोरोनाबाधीत असल्याचे व्टिटच महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी केले आहे. 

हेही वाचा- लाईट जाताच येथे साधा बिनधास्त संपर्क

आज बाधीतांमध्ये शहरातील ३६० व ग्रामीण भागातील ३९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १० हजार ८०३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार १४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३९६ जणांचा मृत्यू झाला असुन ४ हजार २६६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत १३७ पॉझिटिव्ह आले आहेत. यातही सिटी एंट्री पॉइंटवर ३४, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९९ आणि ग्रामीण भागात ४ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यात आज १५५ जणांना सुटी देण्यात आली. यात शहरातील ११५ व ग्रामीण भागातील ४० जणांचा समावेश आहे. 

१८४ व्यापारी पॉझिटीव्ह 

औरंगाबादेत भाजी विक्रेते, किराणा दुकानांसह इतर दुकानदारांचीही कोवीड चाचणी घेतली जात आहे. यात घेण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या अँटीजेन टेस्टमध्ये तब्बल १८४ जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. ही माहिती महापालिका आयुक्तांनी व्टिट करुन दिली. 

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण -६१४१ 
उपचार घेणारे रुग्ण - ४२६६ 
एकूण मृत्यू - ३९६ 
-- 
आतापर्यंत एकूण बाधित - १०८०३ 
-- 

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबादेत चार कारोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३९६ जणांचा बळी कोरोनासह इतर व्याधींमुळे गेला आहे. 

हेही वाचा-शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

सादात नगर येथील ३८ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात ११ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १२ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा १८ जुलैला दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला.

गजानन कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरूषाला घाटी रुग्णालयात १ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला. त्यांचा १९ जुलैला सकाळी सव्वा सातच्या सुमारास मृत्यू झाला.

राधास्वामी कॉलनी, जटवाडा हर्सुल येथील ६५ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १६ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला. त्यांचा १९ जुलैला दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयात एसटी कॉलनी येथील ३० वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचा- CoronaVirus : हंगेरीत अडकलेला औरंगाबादचा विद्यार्थी गंभीर आजारी

हेही वाचा- वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News Shocking 184 Traders Positive In Aurangabad