esakal | औरंगाबाद : दहावीनंतरच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांमध्ये लागणार स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत फोटो११.jpg

महाविद्यालये, तंत्रनिकेतन, आयटीआयसाठी होणार चुरस 

औरंगाबाद : दहावीनंतरच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांमध्ये लागणार स्पर्धा

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य पाहता ९० टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे लोकप्रिय महाविद्यालये, आयटीआय, तंत्रनिकेतनचे ट्रेड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यात कमी गुण मिळवलेले किंवा काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
यंदा राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, मुंबई, कोकण व लातूर या नऊ विभागीय मंडळांमधून १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ लाख एक हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी सरासरी ९५.३० टक्के आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी पाच लाख ३९ हजार ३७३ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी, पाच लाख ५० हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणी, तीन लाख ३० हजार ५८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यात ८० हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १८.२० टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध शैक्षणिक प्रवेशासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

औरंगाबाद विभागातून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे तब्बल ६५ टक्के विद्यार्थी आहेत. सध्या इयत्ता अकरावी, आयटीआयसह इतर तंत्रविषयक अभ्यासक्रमासाठी कॉलेज, महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक लोकप्रिय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तुंबळ स्पर्धा आहे. केवळ अर्ध्या किंवा पाव टक्क्याने विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागू शकते. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

औरंगाबादेत मोठी स्पर्धा 

यंदा औरंगाबाद महापालिका क्षेत्रात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कला विभागाच्या ८ हजार ६१५, कॉमर्सच्या ५ हजार ६२५, विज्ञान शाखेच्या १४ हजार ४४० व एचएसव्हीसीच्या २ हजार ४६५ अशा एकूण ३१ हजार १४५ जागा आहेत. तर आयटीआय प्रवेशासाठी केवळ दोन हजार ३४० जागा आहेत. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत ५९ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी व आयटीआय अशा दोन्हीच्या मिळून एकूण ३३ हजार ४८५ जागा उपलब्ध आहेत. उपलब्ध जागेच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही आयटीआयच्या प्रवेशाकडे लक्ष असल्याने प्रवेशाचे विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

Edited By Pratap Awachar