Coronavirus : कोरोना चाचण्यांची हीच स्थिती राहिली तर लागतील तब्बल ३७ वर्षे

Coronavirus Test Status in India
Coronavirus Test Status in India

औरंगाबाद : भारतात कोविड-१९ चे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. पण, देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर कोविड-१९ च्या चाचण्यांचे प्रमाण नगण्य आहे. सध्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात रोज केवळ एक लाख जणांच्या चाचण्या होत आहेत. याच गतीने जर आपण गेलो तर सर्वांच्या चाचण्या करण्यासाठी तब्बल ३७ वर्षे लागू शकतात. त्यामुळे चाचण्यांचा वेग वाढविण्याची गरज आहे.

जास्तीत जास्त चाचण्या करा, चाचण्यांची गती वाढवा, प्रत्येक संशयिताची चाचणी करा, जोपर्यंत कोविड-१९ ची लागण झालेल्या सगळ्यांची चाचणी होणार नाही, तोपर्यंत त्यांना वेगळे ठेवता येणार नाही आणि तसे केले नाही तर ते इतरांमध्ये राहून कोविड-१९ पसरवत राहतील, असे डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडानाम ग्रेब्रायेसूस सुरवातीपासूनच आवाहन करीत आहेत.

भारतात कोरोनाग्रस्तांपैकी ऐंशी टक्के व्यक्तींमध्ये कुठलेही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे आपण कोविड-१९ बाधित आहोत, हेच अनेक जणांना कळत नाही. अशा व्यक्ती कोविड-१९ च्या वाहक ठरतात. त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी जास्तीत-जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे. पण, आपल्याकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमी संख्या, आवश्यक साधनांचा तुटवडा यामुळे इतर देशांच्या तुलनेत चाचण्यांचा वेग संथ आहे. 
 
अशा झाल्या चाचण्या
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला. त्यानंतर मार्चच्या पंधरवड्यापर्यंत केवळ संपूर्ण देशात १९ ठिकाणीच कोविड-१९ ची चाचणी करण्याची सुविधा होती. मार्च शेवटपर्यंत त्यात वाढ होऊन ती चाचणी केंद्रांची संख्या ७४ झाली. पुढे हळूहळू त्यात वाढ गेली. आता अनेक जिल्हा ठिकाणी आणि काही खासगी लॅबमध्येही चाचणीही सुविधा उपलब्ध झाली आहे.  ३० जानेवारी ते आजपर्यंत (ता. १४) देशात केवळ २० लाखांच्या जवळपास चाचण्या झाल्या. मागील काही दिवसांपासून चाचणीचा वेग वाढला असला तरी तो समाधानकारक नाही. त्यात आणखी गती येणे अपेक्षित आहे.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
  
साधन सामग्रीचा अभाव
सध्या भारतामध्ये एकूण उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांची संख्या, बेडची संख्या तसेच व्हेंटिलेटर, मास्क आणि इतर अत्याधुनिक उपकरणे ही भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षा खूपच कमी आहेत. तसेच रुग्ण तपासाच्या वेळी लागणाऱ्या साधनसामग्रीचा तुटवडा असल्याने डॉक्टर्स, नर्स, पोलिस आणि इतर जे लोक पायाभूत प्राथमिक जबाबदारीने काम करीत आहेत त्यांना थेटपणे संसर्ग होण्याचा धोका आहे.

देशातील आकडे बोलतात
 

  • उपचार सुरू असलेले  - ४९,२१९
  • बरे झाले - २६,२३४ 
  • मृत्यू - २,५४९
      (आकडेवारी ता. १४ मे २०२० च्या सकाळी आठ पर्यंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com