प्लॉटींग व्यावसायिकाला जाळणाऱ्यांना बेड्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

तणातणावातून त्याने गुरुवारी दीडच्या सुमारास प्लॉटचे पैसे दे; अन्यथा तुला जाळून मारू अशी धमकी दिली. त्यावर शेंगुळे यांनी आज एक लाख रुपये देतो, नंतर उर्वरित पैसे देतो, असे आश्‍वासन दिले; मात्र त्यांचे समाधान झाले नाही व त्यांनी शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते.

औरंगाबाद : प्लॉटच्या वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका प्लॉटींग व्यावसायिकाला पेटवणाऱ्या पती-पत्नीला पुंडलिकनगर पोलिसांनी अठरा तासांत अटक केली.

ही कारवाई शुक्रवारी (ता.24) जालना येथील मोतीबाग भागात करण्यात आली. पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना गुरुवारी (ता.23) विश्रांतीनगर येथे घडली होती. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार गजानन दत्तूजी जाधव व स्वाती गजानन जाधव (रा. राजनगर) अशी संशयितांची नावे आहेत. शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) यांना गुरुवारी (ता.23) पेटवून देण्यात आले होते.

विशेषत: या घटनेनंतर त्यांच्या मदतीला कुणी धावले नाही, शेंगुळे यांनीच त्याच अवस्थेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. शेंगुळे यांचा प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी सात महिण्यांपुर्वी सुंदरवाडी येथे वीस बाय तीस आकाराचा प्लॉट राजनगर, मुकुंदवाडी येथील स्वाती गजानन जाधव यांना तीन लाख 22 हजारांत विक्री केला होता.

व्यवहारावेळी प्लॉटची मालकी सातबाऱ्यावर नोंद करून देण्याचे ठरले होते; परंतु सातबाऱ्यावर नाव लागू होत नसल्याने वाद उद्‌भवला होता. सातबाऱ्यावर नाव लावून देत नसल्याने व शेंगुळे टाळाटाळ करीत असल्याने गवंडी काम करणाऱ्या गजानन जाधव व्यथीत होता.

तणातणावातून त्याने गुरुवारी दीडच्या सुमारास प्लॉटचे पैसे दे; अन्यथा तुला जाळून मारू अशी धमकी दिली. त्यावर शेंगुळे यांनी आज एक लाख रुपये देतो, नंतर उर्वरित पैसे देतो, असे आश्‍वासन दिले; मात्र त्यांचे समाधान झाले नाही व त्यांनी शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. या प्रकरणातील तिसऱ्या संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक व घनशाम सोनवणे व त्यांच्या पथकाने केली. 

हेही वाचा - 

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple Arrested For Burning Plotting Business