कोरोनाला हरवायचंय..! मग् काय आणा की मुदगल..! 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने लोक आपल्या प्रकृतीविषयी सजग झाले आहेत. यासाठी घरच्या घरी व्यायाम करता येईल असे साहित्य घेऊन सुदृढ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या साहित्याला मागणी वाढल्याने डंबेल्ससाठी लागणाऱ्या प्लास्टिक कोटेड प्लेटांचा तुटवडा भासत असल्याचे जीमचे साहित तयार करणाऱ्यांनी सांगीतले. तर लाल मातीच्या तालमीत दिसणाऱ्या लाकडी मुदगलचीही मागणी वाढली असून ती विक्रीसाठी रस्त्यावर पहायला मिळत आहे. 

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर त्याची बाधा होऊ नये यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायजर, ग्लोज बाळगण्याची लोकांनी सवय करून घेतली आहे. या खबरदारीबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे त्याहून महत्वाचे ठरत असल्याचे लोकांच्या आता लक्षात आले आहे. नियमित व्यायमशाळा, अत्याधुनिक जीममध्ये जाणाऱ्यांची लॉकडाऊनमुळे अडचण झाली. जीम, व्यायमशाळा बंद असल्याने अशा लोकांनी घरीच व्यायम करण्याचा पर्याय निवडला आहे.

होमजीम व जीमसाठी लागणारे साहित्य तयार करणारे खडकेश्‍वर येथील जाधव फिटनेस सेंटरचे राजेंद्र जाधव यांनी सांगीतले, व्यायमशाळा बंद झाल्यामुळे लोक घरच्या घरी व्यायम करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. यामुळे आम्ही होम जीम तयार केला असून त्याला मागणी वाढली आहे. दुकानातुन डंबेल्स, रॉड, प्लेट्स, मल्टी ॲडजेस्टेबल बेंच यांची मागणी केली जात आहे. ज्यांना व्यायमाची आवड नव्हती असे लोकही आता व्यायमाचे साहित्य विकत घेऊन स्वत:निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

व्यायमामुळे स्वत:ला निरोगी ठेवण्याबरोबरच रोगप्रतिकरशक्तीही वाढवण्यावर लोक भर देत आहेत. रबर कोटेड प्लेटसची देशभरातच एवढी मागणी वाढली आहे की आम्ही पुर्वी कंपन्याकडे रबरकोटेड प्लेटसची मागणी नोंदवल्यावर आठ - दहा दिवसात मिळायच्या मात्र आता एक एक महिना वाट पहावी लागत आहे. 

तालमीत दिसणारी मुदगल रस्त्यावर विक्रीसाठी 
तालमीमध्ये बांधा मजबुत बनवण्यासाठी लाकडी वजनदार मुदगल फिरवली जाते. लॉकडाऊनमुळे तालमी, व्यायमशाळा बंद असल्याने या मुदगलची गरज ओळखून अतिक कुरेशी यांनी ती तयार करून व्यायमाच्या शौकिनांसाठी उपलब्ध करून दिली आहे. कैलासनगरच्या कोपऱ्यावर रस्त्यावर या मुदगल विकायला ठेवण्यात आल्या आहेत. अतिक कुरेशी यांनी सांगीतले, मुदगल दुकानातुन घेतली तर हजार रूपयांच्या पुढेच तिची किंमत असते,

मात्र आम्ही सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. व्यायमशाळा बंद असल्याने किमान घरच्या घरी तरी व्यायम करता येईल यासाठी लोक मुदगल विकत घेत आहेत. बाभळीच्या लाकडापासून आम्ही या तयार करतो. पाच, सहा, दहा आणि पंधरा किलो वजनापर्यंत त्या आहेत. कोणी त्यांना पाहीजे त्या वजनाची मागतली तर ऑर्डरप्रमाणे तयारही करून देण्याचेही सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com