धुळे-सोलापूर महामार्गावर अपघात : कार दुभाजकाला धडकून रॉंगसाईड पलटी; चालकाचा मृत्यू

शेख मुनाफ
Friday, 7 August 2020

या अपघातात कारचालक मोहम्मद मुसदिक खलील अहेमद सिद्दीकी (वय ४०) रा. सिल्कमिल कॉलनी बिड बायपास औरंगाबाद हे मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असणारे तीन जण हे सुखरूप आहे. 

आडुळ (औरंगाबाद) : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आपतगाव (ता. औरंगाबाद) पुलाजवळ  बिडकडे जाणार्या भरधाव कार चालकाचा कारवरील ताबा सूटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. कार चक्क रॉंग साईडला जाऊन पलटली.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला...  

घटना गुरूवारी (ता.६) सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक मोहम्मद मुसदिक खलील अहेमद सिद्दीकी (वय ४०) रा. सिल्कमिल कॉलनी बिड बायपास औरंगाबाद हे मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असणारे तीन जण हे सुखरूप आहे. 

 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद येथून हे चार जण त्यांच्या कामासाठी बीड  जिल्ह्यातील  परळी येथे जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आपतगाव येथील पुलावरून त्यांची कार भरधाव वेगाने खाली येताचं कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकली. रॉंग साईडला जाऊन पलटली, सुदैवाने रॉंग साईडने या वेळात एकही गाडी नसल्याने मोठी जिवीतहानी टळली.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

कदाचित एखादे दुसरे मोठे वाहन किंवा मोटारसायकल औरंगाबादकडे जात असती तर या ठिकाणी मोठा अपघात घडला असता. अपघात ग्रस्त गाडीतील इतर तीन जनांनाही यामुळे धोका झाला. कार पलटल्यानंतर कारमधील तीन जण सुखरूप बाहेर पडले. माञ कारचालक मोहम्मद मुसदिक खलील सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना लगेच स्थानिकांच्या मदतीने चित्तेपिपंळगाव येथील पवार दवाखान्याच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक इब्राहिम भैया शेख   यांनी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टारांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   

वेग मर्यांदेवर निर्बंध नाही, पोलीसांचे दुर्लक्ष 

धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले. त्यामुळे रस्ता गुळगुळीत झाला असल्याने वाहनांची वेग मर्यादा ओलांडून सुसाट वेगाने धावताना दिसतं आहे. या महामार्गावर रोज छोटे मोठे अपघातात घडत असून वाहनावरील वेग मर्यांदेवर कसलेही नियम किंवा निर्बंध घातले जातं नसल्याने वाहने या महामार्गावरून नियमापेक्षा जास्त वेगाने वाहने चालवतं आहे. यावर ट्राफिक पोलीसांचे नियंत्रण नसल्याचा आरोप चित्तेपिपंळगाव परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. 

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhule Solapur highway Accident driver dies