पर्यटनाला निघणार आहात मग हे वाचा, राज्यातल्या शासकीय रिसॉर्टसाठी काय आहे खुशखबर !  

प्रताप अवचार 
Saturday, 5 September 2020

२०२० च्या सुरुवातीलाच भारतात कोरोना महामारीने सुरुवात केली. त्यामुळे क्रिसमसनंतर थंडीच्या महिन्यात राज्यभरात पर्यटनासाठी निघणार्या पर्यटकांचा हिरमुस झाला. त्यानंतर तब्बल पाच महिने सगळीकडे लॉकडाऊन होते. आता पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यसरकार आणि प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन संंघटना सज्ज झाल्या आहेत. 

औरंगाबाद : यंदा कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील पर्यटनावर देखील सावट आले. परंतू पुन्हा सहा महिन्यानंतर देश पुर्ववत सुरू झाला आहे. मात्र, कोरोनाची भिती अद्यापही कायमच आहे. असे असले तरीही पर्यटकांना आता आनंदाची बातमी आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर निवासासाठी असलेले शासकीय रिसॉर्ट आता कोरोनाची नियमावली पाळून ३३ टक्के कक्ष खुले करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना ऑनलाईन बुकींग करता येणार आहेत.      

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन    

२०२० च्या सुरुवातीलाच भारतात कोरोना महामारीने सुरुवात केली. त्यामुळे क्रिसमसनंतर थंडीच्या महिन्यात राज्यभरात पर्यटनासाठी निघणार्या पर्यटकांचा हिरमुस झाला. त्यानंतर तब्बल पाच महिने सगळीकडे लॉकडाऊन होते. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली. हळूहळू सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. त्यात राज्यातंर्गत प्रवास देखील सुरु झाला आहे. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

विशेष बाब म्हणजे म्हणजे औरंगाबाद म्हटले की, महाराष्टाची राजधानी अशी ओळख आहे. कोरोनाच्या कमी झालेल्या सावटानंतर आता पर्यटनाला पुन्हा वेग मिळणार आहे. काही खाजगी मोठ्या हॉटेलमध्ये बुकींग सुरु झाली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यभरातील पर्यटकांना औरंगाबाद येथील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आल्यानंतर निवासाची तारांबळ होणार नाही. कोरोनाची सुरक्षितता बाळगत शासकीय रिसॉर्ट आता सज्ज झाली आहेत. 

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन   

औरंगाबाद जिल्ह्यातील ही आहेत रिसॉर्ट 

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सध्या खुली करण्यात आली नाहीत. मात्र, लवकरच सरकार यावर निर्णय घेणार असल्याचे विश्‍वसनिय सुत्रांनी सांगीतले. औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध असलेल्या वेरुळ, अजिंठा येथील लेण्या आणि शहरातील बीबी का मकबरा, पानचक्की पाहण्यासाठी पर्यटक येतात. विशेष करुन पर्यटकांना कोरोनाच्या काळात सुरक्षितता ठेवत अजिंठा फरदापूर, अजिंठा टी जंक्शन, औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथील रिर्सार्ट खुले करण्यात आले आहे. 

राज्यभरातील ही रिर्सार्ट आहेत सज्ज 
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास नागपूर, माथेरान, ताडोबा, शिर्डी पिलग्रीम्स इन, अजिंठा फरदापूर ,अजिंठा टी जंक्शन, औरंगाबाद, कार्ला आणि माळशेज येथील ३३% कक्षांचे ऑनलाईन आरक्षण सुरू झाले आहे, कोरोना पासून बचावात्मक खबरदारीच्या सर्व उपायांसह पर्यटकांचे स्वागत करण्यास येथील व्यवस्था सज्ज झाली आहेत.

 

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने पर्यटनासह सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट आले आहे. आता काही प्रमाणात लोक बाहेर पडू लागले आहे. राज्यसरकारच्या वतीने पर्यटन स्थळे खुली करावी अशी मागणी आहे. अर्थात ती लवकरच सुरु होतील अशी चिन्हे आहेत. त्यानंतर पर्यटकांची सुरक्षितता ठेवत पर्यटनाचा आनंद देण्याचे मोठे आवाहन राहील. औरंगाबाद जिल्हयातील शासकीय तसेच खासगी रिर्सार्ट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत, 

- श्री. जसवंतसिंग,  औरंगाबाद, टुरिस्ट असोसिएशन प्रमुख  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government resort Good news 33 percentage online booking start