Corona Breaking : हर्सूल कारागृहात कोरोनाचा कहर, दोन अधिकारी, १२ कर्मचारी पॉझिटिव्ह !

मनोज साखरे
Wednesday, 10 June 2020

 कारागृहातील अधीक्षकांसह साठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लाळेचे नमुने नऊ जूनला घेण्यात आले. यात दोन अधिकारी आणि बारा कर्मचारी असे एकूण चौदा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या सर्वांमध्ये लक्षणे आढळून आली नाहीत. अर्थात ते असीमटेमॅटिक आहेत.

औरंगाबाद :  औरंगाबादेत आज  (ता. १०) तब्बल ११४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. दुसरी गंभीर बाब अशी हर्सूल कारागृहातील एकोणतीस जणांना कोवीड विषाणूची बाधा झाली होती. त्यानंतर आज कारागृहातील दोन अधिकारी व १२ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा   

 कारागृहातील अधीक्षकांसह साठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लाळेचे नमुने नऊ जूनला घेण्यात आले. यात दोन अधिकारी आणि बारा कर्मचारी असे एकूण चौदा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या सर्वांमध्ये लक्षणे आढळून आली नाहीत. अर्थात ते असीमटेमॅटिक आहेत. कारागृहाच्या बाहेर दोन बंगले व रेस्ट हाऊस मधील दोन सुट येथे सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आलेले आहे. तसेच तेथे त्यांच्यावर कोविड-१९ टास्क फोर्स कॉर्पोरेशन वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. आज सायंकाळी चार वाजल्यापासून कार्यक्रमाचे लोक डाऊन उघडण्यात येत आहे अशी माहितीही कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

मृत्यूत  वाढ, ११८ जणांचा बळी 

२६ तासातच ८ जणांचा कोरोना आणि इतर व्याधींनी मृत्यू झाल्यानंतर मंगळवारीच (ता.९) दोन रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे २६ तासात एकूण १० रुग्णाचा बळी गेला. भावसिंगपुरा येथील ७९ येथील महिलेचा ९ जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. तसेच दिलरास, बिस्मिल्लाह कॉलनीतील ५५ वर्षीय पुरुषाचा ९ जूनला दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने आज (ता. १०) दिली. 
आतापर्यंत ११८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता कोरोना आणि इतर व्याधींनी होणारे मृत्यू रोखण्याची गरज अधिक आहे. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडताना अधिक सुरक्षित राहण्याची आणि विशिष्ट अंतर राखून व्यवहार करण्याची अधिक गरज आहे. हे केल्यासच संसर्गाचा आलेख कमी होऊ शकेल. 

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   

 आता जिल्ह्यात ८६३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु 
८ मे रोजी १०० रुग्ण, १५ मे रोजी ९३ रुग्ण बाधित झाले होते. ही लॉकडाउनमधील स्थिती होती. अनलॉक-१ मध्ये संसर्ग वाढत असून एक दिवस (४५ रुग्ण ) वगळता बाधितांचा आकडा ७० व त्यापेक्षा अधिक आहे. ९ जूनला ८१ रुग्ण आणि आज ११४ जण बाधित झाल्याने आता दोनच दिवसात रुग्णाचा आकडा दोनशेच्या आसपास (१९५ ) गेला आहे. आता जिल्ह्यात २ हजार २६४ रुग्ण झाले आहेत. तर १ हजार २८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

दुभत्या गायी आणायच्या कशा ? 

आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) 
कैलास नगर (२), कटकट गेट (१), संसार नगर (१), बारी कॉलनी (२),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (१), औरंगपुरा (१),सिडको एन सात (२),अरिहंत नगर (१), न्याय नगर, गारखेडा (१), संजय नगर, बायजीपुरा (१), शांतीनिकेतन कॉलनी (१), गजानन नगर, गारखेडा (१), भानुदास नगर (१), गारखेडा परिसर (५), सारंग सोसायटी (२), सहयोग नगर (२),सिटी चौक (१), खोकडपुरा (१), फाहेत नगर, राहत कॉर्नर (३), हर्ष नगर (२), बाबर कॉलनी (१), टिळक नगर (२), शहा बाजार (१), पडेगाव (३), शिवाजी नगर (१), बेगमपुरा (२), बजाज नगर,सिडको (१), जुना बाजार (१), मुलमची बाजार,सिटी चौक (२), मयूर नगर, एन अकरा (३), एन- आठ (२), आकाशवाणी परिसर (१), मसोबा नगर (१), एन- अकरा (१), एन -चार, सिडको (१), विशाल नगर (१), आदिनाथ नगर, गारखेडा (२), जाधववाडी (१), टी. व्ही. सेंटर (१), आरटीओ ऑफिस परिसर (१),चित्रेश्वर नगर (१), बीड बायपास (१), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (२), रोकडिया हनुमान परिसर (१), मस्के पेट्रोलपंपाजवळ (१), प्रताप नगर,सिडको (१), एन - सहा, साई नगर,सिडको (१), बंजारा कॉलनी (१), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (१), ज्योती नगर, दर्गा रोड (१), इंदिरा नगर, बायजीपुरा (१), सावरखेडा, ता. सोयगाव (२), कन्नड (१), सिता नगर, बजाज नगर (५), बजाज नगर परिसर (११), सिडको वाळूज महानगर एक (२), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), गणेश नगर, पंढरपूर (२), अन्य (१६) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ३९ महिला आणि ७५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना मीटर 

  1. बरे झालेले रुग्ण      - १२८३
  2. एकूण मृत्यू            - ११८
  3. उपचार घेणारे रुग्ण - ८६३

एकूण रुग्णसंख्या    - २२६४
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harsul jail, two officers 12 employees positive