esakal | हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हिंदूच्या भावना कळेना, कोण म्हणाले (पहा VIDEO)  
sakal

बोलून बातमी शोधा

bjp.jpg

आमदार अतुल सावे यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीका. 
भाजपचे घंटानाद आंदोलन. 

हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हिंदूच्या भावना कळेना, कोण म्हणाले (पहा VIDEO)  

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यापासून मंदिरे बंद आहेत. यावर अवलंबून असलेले पुजारी फुल विक्रेते व बारा बलुतेदारावर उपासमार होत आहे. दारू व मास विक्री सुरु आहे. दुसरीकडे हिंदुत्वाचा नारा देत फिरणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदू जनतेच्या भावना लक्षातच आल्या नाहीत असा आरोप आमदार अतुल सावे यांनी शनिवारी (ता.२९) केला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेत गजानन महाराज मंदिरासमोर आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजेपासून आंदोलनात सुरुवात झाली. यावेळी महाआघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. "दार उघड उद्धवा,दार उघड' या आशयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार अतुल सावे म्हणाले की, ज्या हिंदूंच्या मनावर हे सरकार निवडून आले त्यांचीच भावना मुख्यमंत्र्याना लक्षात येत नाहीये. गेल्या पाच महिन्यांपासून पुजाऱ्यास फूल विक्रेते व यावर अवलंबून असलेला बारा बलुतेदार हा उपाशी मरत आहे. हे सरकार केवळ सर्वसामान्यांची काळजी नाही त्यांना केवळ मास व दारू विक्रेत्यांची ची काळजी आहे असा आरोपही सावे यांनी केला. ५ ऑगस्टला देशभरात राम जन्मभूमि पूजनाचा जल्लोष साजरा करण्यात आला मात्र राज्यात रामाची पूजा करणाऱ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. लॉक डाऊन काळातही दोन-दोन तास मास विक्री व दारू विक्रीला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच आम्ही घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हिंदूच्या भावना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मंदिरे उघडली नाही तर सर्वसामान्यांचा उद्रेक होईल. यामुळे मंदिरे उघडा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या आंदोलनात खासदार डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष संजय केणेकर, धावणी मोहल्ला येथील गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी खडक सिंग अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय खानाळे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, अनुसूचित जाति मोर्चाचे जालिंदर शेंडगे ,महिला मोर्चाच्या सरचिटणीस सविता कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्षा माधुरी अदवंत, राजेश मेहता, दयाराम बसय्ये, गोविंद केंद्रे,लक्ष्मीकांत थेटे,संजय बोराडे, बालाजी मुंडे,अशोक दामले, मंगलमूर्ती शास्त्री, विवेक राठोड, नवीन गिरी,डॉ. राम बुधवंत, समीर राजूरकर, अनिल मकरिये यांनी सहभाग घेतला. 

(संपादन-प्रताप अवचार)