शहागंजमधील ऐतिहासीक घड्याळाची टिकटिक २९ लाखांना! 

शहागंज घड्याळ.jpg
शहागंज घड्याळ.jpg

औरंगाबाद : शहागंजमधील निजामकालीन ऐतिहासिक घड्याळ दुरुस्त करण्यासाठीच्या गेल्या काही वर्षांपासून नुसत्याच चर्चा सुरू होत्या. मात्र आता या कामाला लवकरच मुहूर्त लागणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. २९ लाख ११ हजार रुपये घड्याळ दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामावर खर्च केले जाणार आहेत. 

शहागंज चमन येथील घड्याळाला ऐतिहासिक वारसा आहे. शेवटचा निजाम मिर उस्मान अली खान यांनी १९३० मध्ये याठिकाणी टॉवर उभारून त्यावर घड्याळ लावली. रमजान उपसावातील सहर आणि इफ्तार सोडविण्यासाठी या घडीचा अलार्म वाजविला जायचा. नंतर मात्र महापालिकेने या घड्याळाकडे दुर्लक्ष केले. देखभाल दुरुस्ती अभावी अनेक वर्षांपासून घड्याळ बंद आहे.

ही संस्थांनी पुढाकार घेत घड्याळाची दुरुस्ती करण्याची तयारी केली. मात्र त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही. त्यामुळे हे काम स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोऱ्याचे सुशोभीकरण आणि घड्याळाची दुरुस्ती अशा दोन टप्प्यातील कामासाठी दोन दिवसांपूर्वीच २९ लाख ११ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. १८ नाव्हेंबर ही निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, असे प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले. 

तंत्रज्ञांचा घेणार शोध 
घड्याळ जुनी असल्याने तिची दुरुस्ती करण्यासाठी तंत्रज्ञान जाणणारा व्यक्ती शोधावा लागणार आहे. औरंगाबादेत कोणी दुरुस्ती करणारा मिळाला नाही तर हैद्राबादेमध्ये विचारणा केली जाणार आहे, असे स्नेहा बक्षी यांनी स्पष्ट केले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com