औरंगाबाद : ॲण्टीजेन टेस्ट वाढवा, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश 

rajesh tope.jpg
rajesh tope.jpg

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ॲण्टीजेन टेस्टिंग वाढवा. मृत्यूदर कमी करण्यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची संख्या वाढवण्यात यावी, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता.नऊ) दिले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालायात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

बैठकीस उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, डॉ. जी. एम. गायकवाड, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, औषध विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची उपस्थिती होती.

श्री. टोपे यांनी सर्व रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आणि स्क्रीनिंग सुविधा ठेवावी. वरिष्ठ डॉक्टरांनी सातत्याने तपासणी, रुग्णांच्या प्रकृतीमधील बदल नियंत्रित करणे गरजेचे आहे. प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करा, आदी सूचना दिल्या. 

कोण काय म्हणाले 

ग्रामीण भागात रुग्णाचे निदान आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. डिसीएचसीमध्ये १६९८ खाटा तर सीसीसीमध्ये ८ हजार १८० खाटा उपलब्ध आहेत.

 उदय चौधरी , जिल्हाधिकारी 


  सध्या दरदिवशी सरासरी ९०० स्वॅब तपासण्यात येत आहे. शहरातील सहा सीसीसीमध्ये ११०० खाटा उपलब्ध असून त्यापैकी ८०० खाटा सध्या भरलेल्या आहेत. 
आस्तिककुमार पांडेय, मनपा  आयुक्त

घाटीमध्ये प्रयोगशाळेत दररोज ९०० च्या वर स्वॅब तपासण्यात येत असून ४५६ खाटांपैकी ३२४ खाटा भरलेल्या असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ टक्के आहे. घाटीत प्लाझ्मा थेरपी उपचार सुरू करण्यासाठी एनआयव्हीकडे सॅम्पल पाठवण्यासाठी त्यांची परवानगी मिळाली पाहिजे. 
डॉ. कानन येळीकर , अधिष्ठाता

आतापर्यंत ४०५ गंभीर स्थितीतील रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ४५ आयसीयुत दाखल असून, प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यासाठी तांत्रिक, प्रशासकीय बाबींची पुर्तता झाली आहे. 
डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य

जिल्हा रूग्णालयातून आतापर्यंत ७८४ रूग्ण बरे होऊन घरी गेले. खाटांची संख्या २०० पर्यंत वाढवण्यात येत आहे.

डॉ. सुदंर कुलकर्णी , जिल्हा शल्यचिकीत्सक 

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com