CoronaVirus : लॉकडाऊनचे पालन झाले, तर भारत कोरोनाला हरवू शकतो

अनिलकुमार जमधडे
Tuesday, 7 April 2020

दुबईत वास्तव्यास असलेले भाऊसाहेब आरबड यांचा विश्वास ​

औरंगाबाद : कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन आहे. दुबईमध्ये अत्यंत कडक कायदे असल्यामुळे सर्वजण नियम पाळतात. असे असले तरीही दुबईत बाधितांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत भारताकडून खूप चांगली काळजी घेतली जात आहे. सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाली तर सहज कोरोनाचे संकट भारतातून सहज परतणार आहे, असा विश्वास पैठणचे (जि. औरंगाबाद) रहिवासी आणि सध्या दुबईत असलेले भाऊसाहेब आरबड यांनी व्यक्त केला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाच्या अनुषंगाने भाऊसाहेब आरबड यांनी सांगितले की, ‘‘मी बार दुबई (बुर्ज मान सेंटर) येथे यांत्रिकी अभियंता आहे. दुबईमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. सर्व लोक घरूनच काम करीत आहेत. येथे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रोज केसेस वाढत आहेत. सध्या दुबईत कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजारांच्या पुढे गेला आहे. लॉकडाऊन असल्याने केवळ अत्यावश्यक सेवा चालू आहेत. सध्या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले आहेत. शासन सर्व प्रकारची मदत करीत आहे. काही ठिकाणी तीन महिन्यांचे भाडे माफ केले आहे. कठोर शिक्षा, कडक अंमलबजावणीमुळे सर्व जण नियम पाळत आहेत. एकही स्थानिक व्यक्ती कामावर नाही, सर्व घरून काम करीत आहेत. खूप लोकांना रोजगार गमावून बसावे लागेल अशी परिस्थिती आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्या तुलनेत भारतामध्ये फार लवकर काळजी घेण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारांनी पूर्वीच लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे जगाच्या तुलनेत भारताची परिस्थिती खूप चांगली आहे. भारताची आफाट लोकसंख्या आणि उपलब्ध आरोग्याच्या सोयी सुविधा बघता काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याच दृष्टीने भारत सरकार काम करीत आहे, ही समाधानाची बाब आहे.’’ 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

हात जोडून विनंती 
आरबड म्हणाले, ‘‘नागरिकांनी सरकारच्या सूचनेचे पालन करावे लॉकडाऊन पाळला तर निश्चित कोरोनापासून दूर राहता येईल, अशी आशा आहे. भारतातील नागरिकांनी पुरेपूर पालन केले. निश्चित कोरोनापासून मुक्ती मिळविणे अवघड नाही. आम्ही दुबईत असलो तरीही मनाने मात्र भारतातच आहोत. आम्ही घरात आहोत, तुम्हीही घरात राहून कोरोनाला हद्दपार करा ही हात जोडून विनंती आहे.’’ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Follow LockDown, Easily Defeated Corona, Dubai Resident Bhausaheb Arbad Advise