औरंगाबाद खंडपीठात आजपासून प्रायोगीक तत्‍वावर व्‍यक्‍तीशः सुनावणीला प्रारंभ

सुषेन जाधव
Tuesday, 1 December 2020

व्‍यक्‍तीशः सुनावणीचे कामकाज प्रायेागीक तत्‍वावर १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या कामकाजादरम्यान खंडपीठात चार डिव्‍हीजन बेंच व चार सिंगल बेंच सुनावणीचे कामकाजासाठी बसणार आहेत. हे कामकाज दोन सत्रात अर्थात साडे दहा ते दीड व अडीच ते साडेचार दरम्‍यान होईल. सुनावणी दरम्‍यान तसेच खंडपीठ इमारतीत कोवीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्‍साठी विविध सुचना व निर्बंध जारी केले आहेत.

औरंगाबाद : कोवीडमुळे मार्चपासून खंडपीठाचे सुनावणीचे कामकाज ऑनलाईन पध्‍दतीने सुरु होते. आता कोवीड-१९ बाबतच्‍या सूचनांचे पालन करुन व्‍यक्‍तीशः सुनावणीचे कामकाज एक डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत नाताळाच्‍या सुट्टीचा कालावधी वगळता पूर्वीप्रमाणे प्रायोगीक तत्‍वावर व्‍यक्‍तीशः सुनावणी घेण्‍याचा निर्णय उच्‍च न्‍यायालय प्रशासनाने घेतला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
व्‍यक्‍तीशः सुनावणीचे कामकाज प्रायेागीक तत्‍वावर १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या कामकाजादरम्यान खंडपीठात चार डिव्‍हीजन बेंच व चार सिंगल बेंच सुनावणीचे कामकाजासाठी बसणार आहेत. हे कामकाज दोन सत्रात अर्थात साडे दहा ते दीड व अडीच ते साडेचार दरम्‍यान होईल. सुनावणी दरम्‍यान तसेच खंडपीठ इमारतीत कोवीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्‍साठी विविध सुचना व निर्बंध जारी केले आहेत. दिवसात प्रत्‍येक बेंचला ५० प्रकरणापर्यंत काम करता येईल व त्‍याप्रमाणे बोर्ड तयार करण्‍यात येईल. न्‍याय दालनात सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करणे अनिर्वाय असेल. खंडपीठात प्रकरणात संबंधीत पक्षकाराचे वकील ज्‍यांची केस बोर्डावर आहे. त्‍यांनाच प्रवेश देण्‍यात येणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यासोबत त्‍यांनी जेष्‍ठ विधीज्ञ लावले असल्‍यास, त्‍यांना प्रवेश देण्‍यात येईल. न्‍याय दालनात जे प्रकरण पुकारले अशाच वकील अथवा पक्षकाराला वकील अथवा व्‍यक्‍तीशः प्रकरण चालविणा-या पक्षकारास प्रवेश देण्‍यात येईल व व प्रतिक्षेतील वकील अथवा इतर वकील अथवा पक्षकार न्‍याय दालनासमोर सामाजिक अंतराचे पालन करुन प्रतिक्षा करु शकतील. उच्‍च न्‍यायालयीन वकील संघाने वेळोवेळी व्‍यक्‍तीशः सुनावणी घेण्याबाबत उच्‍च न्‍यायालय प्रशासनास पाठपुरावा केला होता व वकील संघाची व्‍यक्‍तीशः सुनावणीची विनंती मान्‍य केल्‍याने तसेच खंडपीठाचे न्‍यायालयीन कामकाज पुर्ववत सुरु केल्‍याबद्दल मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे आभार व्‍यक्‍त केले. ही माहिती हायकोर्ट बार असोशियशनचे सचिव अॅड. शहाजी बी. घाटोळ-पाटील यांनी दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Individual hearing on experimental basis starts from today Aurangabad bench