किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या लाखांचे कर्ज

प्रकाश बनकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शेतकरी सावकाराच्या पाशातून सुटावेत याच हेतूने सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्यात आली आहे.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांना सन्मानाने जगता यावेत, शेतकरी सावकाराच्या पाशातून सुटावेत याच हेतूने सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्यात आली आहे. माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगालाही पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज मिळणार आहे. तर उर्वरित दोन लाखांच्या रकमेतून शेतीपूरक उद्योगातील कोंबडीपालन, मत्स्य व्यवसाय आदींसाठी कर्ज घेता येणार आहे. हेच कार्ड शेतकऱ्यांना सक्षम करण्यास मदत करणार आहे.

याविषयी जनजागृती मेळावे घेत असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे व जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली. 

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...   

श्री. सुर्वे म्हणाले, की जिल्हा बॅंकेत प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत 91 हजार 268 लाभार्थी असून, त्यातील 28 हजार 10 शेतकरी कार्डचा लाभ घेतात. उर्वरित 63 हजार 258 शेतकरी लाभार्थी नसून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जालना जिल्हा बॅंकेतील 59 हजार 29 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 35 हजार 417 शेतकऱ्यांचे कार्ड सुरू आहे. तर 23 हजार 612 लाभ घेत नाहीत. हिंगोली व परभणी संयुक्त असलेल्या जिल्हा बॅंकेतील एक लाख 38 हजार 192 शेतकरी कार्डच्या लाभार्थी संख्येत असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

 वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा    

शेतकऱ्यांकडील कार्डचा उपयोग करावा. त्या माध्यमातून एक ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने घेता येणार आहे. तर एक लाख रुपयांचे कर्ज वेळेत फेड केली तर त्यावर कसलेही व्याज आकारले जाणार नाही. उर्वरित दोन लाखांमधून कोंबडी, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय आदी शेतीपूरक उद्योगांसाठी कर्ज घेता येणार आहे.

हेही वाचा- सयाजी शिंदे म्हणाले, मी वड बोलतोय... माझा जन्म १८५७ चा 

पुढील 15 दिवसांत मेळावे  

पीककर्जही घेता येणार आहे. पुढील 15 दिवसांत जिल्हा बॅंक, ग्रामीण बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या प्रत्येक शाखेला मिळून मेळावे घेत शेतकऱ्यांना हे कार्ड वाटप होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी सांगितले. यावेळी मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेझ, दत्तात्रय दिवटे उपस्थिती होते. 

हे वाचलंत का?आधीच नवरा, दोन मुले असताना दुसऱ्याशी लग्न : त्यानंच काढलं शोधून 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kisan will give credit card to 75 lakh farmers in Marathwada