esakal | VIDEO : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देणारा 'दुर्मिळ दस्तावेज'
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada.jpg

ग्रंथालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम विषयी विविध प्रकारचे ३६० ग्रंथ आहेत. या मध्ये इंग्रजी भाषेतील ५० ग्रंथ, उर्दू, तेलगू भाषेतील १२ ग्रंथ तर अन्य ग्रंथसंपदा मराठी भाषेतून प्रकाशीत आहेत. विशेष म्हणचे निजामकालिन पत्रव्यवराचा समावेश आहे. मुक्तीसंग्रामाच्या लढयानंतर संपादित झालेल्या ग्रंथसंपदेत मुक्तीसंग्रामपूर्वीच्या राजवटीवर भाष्य करणारी देसाई यांच्या २७ खंडाचाही समावेश आहे. प्रत्येक खंड हा आठशे पानांचा आहे. 

VIDEO : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देणारा 'दुर्मिळ दस्तावेज'

sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातील माहिती नसलेल्या अनेक पैलू आजच्या युवकांनी जाणून घेण्याची गरज आहे. त्या वेळचे धगधगते वास्तव युवकांसमोर आले पाहिजे. यासाठी मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देणारा दुर्मिळ दस्तावेज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्राने जपला आहे. तब्बल साडे तीनशे पेक्षा अधिक ग्रंथ व क्रांतीकारकांच्या पत्रांच्या सत्यप्रतीचा यात समावेश आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही हैदराबादचे निजाम स्वतंत्र भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. दिवंसेदिवस त्यांची अराजकता वाढून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

निजामाच्या त्रासाला कंटाळून व हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन व्हावे म्हणून मोठी चळवळ सुरु झाली. याची सर्वात प्रथम सुरुवात मराठवाड्यातून झाली. या लढयात अनेकांनी प्राणांची आहुतीही दिली. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामराजवटीतून हैदराबाद-मराठवाडा मुक्त झाला. हा एवढाच विषय आजच्या युवकांना माहित आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु १५ ऑगस्ट १९४७ ते १७ सप्टेंबर १९४८  या कालावधीत निजाम राजवटीतील असलेल्या भागांची तत्कालिन परिस्थिती कशी होती. समाजातील आर्थिक, राजकीय व सामाजिक वातावरण कसे होते. मराठवाडा मुक्तीसाठी क्रांतीकारकांच्या चळवळीचे केंद्र कोणते होते. कोणी पुढाकार घेतला. यासह क्रांतीकारकांच्यां पत्रव्यवहाराचा संपूर्ण खजीना अभ्यासला तर त्यावेळची निजाम राजवटीची दाहकता व क्रांतीकारकांचा लढा प्रत्येकाच्या अंगावर काटा आणेल. अशीच संपुर्ण माहिती मिळवायची असेल तर नागेश्‍वर वाडीतील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेला नक्कीच भेट द्या. 

या संस्थेच्या ग्रंथालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम विषयी विविध प्रकारचे ३६० ग्रंथ आहेत. या मध्ये इंग्रजी भाषेतील ५० ग्रंथ, उर्दू, तेलगू भाषेतील १२ ग्रंथ तर अन्य ग्रंथसंपदा मराठी भाषेतून प्रकाशीत आहेत. विशेष म्हणचे निजामकालिन पत्रव्यवराचा समावेश आहे. मुक्तीसंग्रामाच्या लढयानंतर संपादित झालेल्या ग्रंथसंपदेत मुक्तीसंग्रामपूर्वीच्या राजवटीवर भाष्य करणारी देसाई यांच्या २७ खंडाचाही समावेश आहे. प्रत्येक खंड हा आठशे पानांचा आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लढ्यात मोलाचा वाटा देणारी गोविंदभाई श्रॉफ व त्यांच्या सहकार्यांविषयी असलेला १७ हजार पानांचा दस्तावेज पाहायला मिळतो. मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी मराठवाडा दैनिकाचे अनंत भालेराव यांनी लिहलेल्या हैदराबादचा मुक्तीसंग्राम या ग्रंथाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हैदराबाद वस्तूसंग्रहालयाचे रा. मु. जोशी यांच्या माध्यामतून मिळालेल्या संशोधनपर प्रत्रिकांचा संग्रह या ठिकाणी पाहावयास मिळतो. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून वर्तमानपत्रांची भूमिका म्हणून अनेक दैनिके, साप्ताहिके, मासिके यांचा दस्तावेज तत्कालिन परिस्थिती डोळयासमोर आणतो. तसेच निजामाचे फर्मान निघाले असे आपण इतिहासकाराकडून ऐकून आहे. मात्र याठिकाणी निजामांच्या फर्मानाच्या सत्यप्रती पाहावयास मिळतात. 

संशोधनासाठी उपयोग व्हावा
संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाबद्दल विचारमंथन केले जाते. मराठवाड्याचा अनुशेष भरला पाहिजे. मराठवाडयाचा सर्वांगिण विकास कसा होईल. याविषयी पसातत्याने काम सुरु असते. विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना सदैव ताजे ठेवण्यासाठी तत्कालिन महत्त्वपुर्ण दस्तावेजाचा समावेश संस्थेच्या ग्रंथालयात आहे. वाचकांनी, अभ्यासकांनी, नवीन पिढीतील युवकांनी संशोधक म्हणून या दस्तावेजाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसे आमचे आम्ही आवाहनही करतो. सर्वांचे येथे स्वागतच राहील. तरुण पिढीने पुढाकार घेऊन नवीन लिखान करावे, काळाच्या पडद्याआड गेलेले महत्त्वाची नोंद करण्यासाठी संशोधन करणे अत्यावश्यक आहे.  
डॉ. शरद अदवंत, (सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था) 

 

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील क्रांतीकारकांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे ग्रंथालय काम करीत आहे. विशेष म्हणजे मुक्तीसंग्रामात हुतात्म पत्करलेल्या अनेकांचे जीवनचरित्र येथे आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी संशोधन  

प्रा. चंद्रकांत जोशी (माजी ग्रंथपाल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्र)