नरेंद्र चपळगावकर यांना मानाचा पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

न्या. नरेंद्र चपळगावकर हे अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध वक्ते असून, त्यांनी चरित्र - आत्मचरित्रांबरोबरच विविध वैचारिक ग्रंथांचे लेखन केलेले आहे. तसेच विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळालेले असून अनेक संस्थांवर त्यांनी काम केलेले आहे. 

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि प्रसिद्ध लेखक नरेंद्र चपळगावकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला राम शेवाळकर पुरस्कार गुरुवारी (ता. 13) जाहीर झाला. 

राज ठाकरे अडकले औरंगाबादच्या..

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम शेवाळकर यांच्या कुटुंबियांनी या पुरस्काराचे प्रायोजकत्व स्वीकारलेले असून नांदेड येथे समारंभपूर्वक तो प्रदान करण्यात येणार आहे. 

आदित्य ठाकरे यांचं औरंगाबादेत मोठं वक्तव्य

हा पुरस्कार दरवर्षी ज्येष्ठ मान्यवर साहित्यिक, ज्येष्ठ भाषावैज्ञानिक किंवा भाषाभ्यासक आणि ज्येष्ठ अभ्यासू वक्ता यांना क्रमाक्रमाने देण्यात यावा, अशी साहित्य महामंडळाची व शेवाळकर कुटुंबियांची भूमिका आहे. यापूर्वीचे दोन पुरस्कार अनुक्रमे साहित्यिकाला व भाषाभ्यासकांना देण्यात आलेले असून क्रमाने तिसरा, पण अभ्यासू वक्‍त्यासाठी असलेल्या पहिल्या राम शेवाळकर स्मृतिपुरस्काराची निवड महामंडळाच्या निवड समितीने 11 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत एकमताने केली. 

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण

न्या. नरेंद्र चपळगावकर हे अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध वक्ते असून, त्यांनी चरित्र - आत्मचरित्रांबरोबरच विविध वैचारिक ग्रंथांचे लेखन केलेले आहे. तसेच विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळालेले असून अनेक संस्थांवर त्यांनी काम केलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Chapalgaonkar To Be Awarded By Ram Shewalkar Award Maharashtra News