esakal | पुण्यातील नातू स्मृती पुरस्कार जाहीर; मराठवाड्याचे दिवाकर कुलकर्णी, उमाकांत मिटकर यंदाचे मानकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Diwakar Deshpande And Umakant Mitkar

ग्रामीण विकास व सामाजिक सेवा क्षेत्रात प्रतिष्ठित असलेला ‘महादेव बळवंत नातू’ या पुरस्कार यंदा येथील नागरी वस्त्यांमध्ये सेवाकार्य करणाऱ्या डॉ. दिवाकर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.

पुण्यातील नातू स्मृती पुरस्कार जाहीर; मराठवाड्याचे दिवाकर कुलकर्णी, उमाकांत मिटकर यंदाचे मानकरी

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : ग्रामीण विकास व सामाजिक सेवा क्षेत्रात प्रतिष्ठित असलेला ‘महादेव बळवंत नातू’ या पुरस्कार यंदा येथील नागरी वस्त्यांमध्ये सेवाकार्य करणाऱ्या डॉ. दिवाकर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. तसेच सुलोचना नातू स्मृती सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यात भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणारे उमाकांत मिटकर यांना जाहीर झाला आहे.
पुणे येथील नातू फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. डॉ.दिवाकर कुलकर्णी यांना जाहीर झालेल्या नातू पुरस्काराचे स्वरुप एक लाख रूपये, शाल व स्मृतीचिन्ह असे आहे.

मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी रिमझिम पाऊस, पिकांना फटका 

हा पुरस्कार प्रामुख्याने एक तपाहून अधिक काळ ध्येयवादी वृत्तीने सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्याला दरवर्षी देण्यात येतो. डॉ. दिवाकर कुलकर्णी हे औरंगाबादेतील नागरी वस्ती परिसरात प्रत्यक्ष राहून गेली दोन तपांहून अधिक काळ डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून निष्ठापूर्वक वैद्यकीय सेवाकार्य तसेच सामाजिक समरसतेचे कार्य करत आहेत. सध्या ४० नागरी वस्त्यांमधून हे काम चालू आहे. त्यांच्या पत्नी सविता कुलकर्णी यादेखील या वस्त्यांत महिला संघटनाचे काम करत आहेत.

परळी पंचायत समितीच्या सभापती असलेल्या पत्नीविरोधात अविश्वास ठराव; जमावबंदी तोडल्याने पतीला अटक, घरी सापडली शस्त्रे


ध्येयवादी वृत्तीने किमान पाच वर्षे कार्यक्षेत्रात पूर्णवेळ राहून सामाजिक कार्य करणा-या कार्यकर्त्यास ‘सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार’ ‘सुलोचना नातू’ ट्रस्टतर्फे दरवर्षी देण्यात येतो. २५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. यमगरवाडी (ता.तुळजापूर,जि.उस्मानबाद) परिसरातील ग्रामीण भागात राहून पालावरच्या शाळा व अन्य प्रकारचे शैक्षणिक कार्य करणाऱ्या उमाकांत मिटकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भटके विमुक्त समाजातील मुला-मुलींना पालावरच्या शाळा उपक्रमातून शैक्षणिक प्रवाहात आणण्यात त्यांचा वाटा आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
 

शनिवारी पुण्यात सोहळा
शनिवारी (ता. नऊ) पुण्यात हा पुरस्कार प्रदान सोहळा महादेव बळवंत तथा भाऊसाहेब नातू यांच्या ३४ व्या स्मृतीदिनानिमित्त मराठवाड्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनमधील नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होणार असल्याची माहिती नातू ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर यार्दी व दत्ता टोळ यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे नियम पाळून मर्यादित संख्येच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कार्यक्रम होणार आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर