औरंगाबादसाठी महत्त्वाची बातमी : पाणीपुरवठा योजनेची स्थगिती अखेर उठविली

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद- शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या 1,680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील अडथळा आता संपला आहे. निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्याचे पत्र राज्य शासनाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शनिवरी (ता. 18) प्राप्त झाले आहे. 

शासनाने शहरासाठी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजुर केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरु केली. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुन्या सरकारने विधानसभा निवडणूकीपुर्वी ज्या योजनांना मंजूरी दिली होती पण वर्कऑर्डर देण्यात आले नव्हचे अशा कामांना स्थगिती दिली. त्यात शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा समावेश होता. दरम्यान भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी याविरोधात आंदोलनही केले. त्यामुळे शासनाने कामाला स्थगिती आदेश नसल्याचे पत्र काढले मात्र कार्यारंभ आदेशाचा या पत्रात उल्लेख नसल्याने संभ्रम होता.

दरम्यान जीवन प्राधिकरणाने निविदा दाखल करण्याची मुदत तीनवेळा वाढवली. पाणी योजनेसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्कऑर्डरची स्थगिती उठवल्याचे पत्र जीवन प्राधिकरणाला तीन दिवसात पाठवले जाईल व पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने केले जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता17) नगर विकास खात्याकडून जीवन प्राधिकरणाला पत्र प्राप्त झाले. वर्कऑर्डर देण्यास या पत्राव्दारे परवानगी देण्यात येत असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर देण्यास स्थगिती नसल्याचे शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. प्री बीड बैठकीचे ठळक मुद्दे शासनाला पाठवणार आहोत, असे जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अजय सिंह यांनी सांगितले. 


जानेवारीअखेरीस उघडणार निविदा 
पाणी योजनेसाठी टाकल्या जाणाऱ्या पाईपलाईनची अलाईनमेंट निश्‍चित झाली आहे. आता वर्कऑर्डर संदर्भातील स्थगिती उठली. प्री-बीड बैठकदेखील झाली. निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होत आली आहे. निविदा दाखल करण्याची 25 जानेवारी शेवटची तारीख आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेतील सर्व अडथळे दूर झाल्याचे मानले जात आहे. निविदा 27 किंवा 28 जानेवारी रोजी उघडल्या जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com