गॅलरीतूनही डोकावू लागल्या महावितरणच्या वीज तारा! कोणत्या शहरात आहे ही स्थिती...

photo
photo

औरंगाबाद : ‘वीज म्हणाली धरतीला...’ अशा आशयाची एक काव्यपंक्ती ऐकून सुखद वाटते. पण शहरात या काव्यपंक्तीचा प्रत्यय अर्ध्या शहरात वेगळ्या अर्थाने येत आहे. शहरातील दाटीवाटीच्या भागांमध्ये विजेच्या धोकादायक लोंबकळणाऱ्या तारा जणू जमिनीला टेकण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. वर्षानुवर्षे मृत्यूची टांगती तलवार नागरिकांच्या अंगावर आहे. अधून मधून विजेच्या धक्क्याने मृत्यूच्या घटना घडत असतानाही महापालिका आणि महावितरण लक्ष देण्यास तयार नाही. 
सिडको-हडकोमधील एन-६, एन-७, एन-९, एन-११, एन-१२, सिद्धार्थनगर, भारतनगर, जवाहर कॉलनी, जवाहर नगर, उत्तम नगर, बुद्ध नगर, गजानन नगर, गजानन कॉलनी, पडेगाव, अन्सार कॉलनी, भीमनगर, भुजबळनगर, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनी तसेच विविध नविन वसाहतींमध्ये अगदी घरांना खेटून वीज तारा आहेत. घराच्या खिडकीतून, गॅलरीतून, जिन्यावरून, गच्चीवरून अगदी हात लागेल अशा पद्धतीच्या वीज तारांचे जाळे जीविताला धोका निर्माण करणारे आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

नागरिकांनीच केल्या उपाययोजना 

घरांवरून विजेच्या तारांचे जाळे असल्याने केव्हा विजेचा धक्का लागेल हे सांगता येत नाही म्हणून नागरिकांनीच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ‘हाता’शी धरुन घराभोवती असलेल्या तारांवर पीव्हीसी पाइपचे आच्छादन केलेले आहे. मात्र हे काही प्रत्येकाला शक्य नसल्याने अनेकांच्या घरे, भिंती, खिडक्या, गच्चीजवळ धोकादायक तारांचे जाळ कायम आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घरांचा झालाय विस्तार 

बहुतांश भागात पूर्वी लहान-लहान घरे होते. काळानुरुप गरजेनुसार नागरिकांनी घरांचा विस्तार केला त्यामुळे घरांच्या अगदी जवळ तारा आल्याचा महावितरणचा दावा आहे. मात्र, मुळात भविष्यात घरांचा विस्तार होणार आहे हे गृहीत धरुन विजेचे खांब, तारांचे नियोजन का केले नाही, याबद्दल प्रशासनाला उत्तर देता येत नाही. विशेष म्हणजे मनपा किंवा महावितरणच्या यंत्रणेने तारांचे जाळे संपवण्यासाठी साधा विचारही केलेला नाही. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

नागरिक म्हणतात... 
 
विजेच्या तारा घरावर 

राजेश गवई (भुजबळनगर, नंदनवन कॉलनी) ः भुजबळनगर, नंदनवन कॉलनी भागात विजेच्या तारा घरावरून गेलेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका आहे. नागरीकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. 

रस्त्यात उभा ट्रान्सफॉर्मर 

रामभाऊ म्हस्के (भीमनगर, भावसिंगपुरा) ः भीमनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घरांवरून उच्च दाबाची वीजवाहिनी गेलेली आहे. त्याप्रमाणे नंदनवन कॉलनी, भुजबळ नगर येथे रेशन दुकानाजवळ उघडे ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मधोमध आहे. 

पावसाळ्यात धोका अधिक 

शाम बारस्कर (द्वारकानगर हडको) ः हडको परिसरातील अनेक घरांवरुन आणि घराला खेटुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. पावसाळ्यात हा धोका अधिक वाढलेला असतो. अनेकवेळा अपघात झाल्याने नागरीकांचे जिव गेलेले आहे. 

मोहन पुंड (सिडको) ः सिडको हडकोमध्ये नव्वद टक्के घरांना विजेच्या तारांचा धोका आहे. प्रत्येक पावसाळ्यात विजेच्या अपघाताने एकतरी मृत्यू होतोच. त्यामुळे अशा ठिकाणी अंडरग्राऊंड केबल टाकली पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com