भीषण वास्तव! दररोज घरी येतात चारशे मृतदेह....

Road accident
Road accident

औरंगाबाद - माणसे घरातून बाहेर पडतात; पण अपघातानंतर देशभरात दररोज चारशे मृतदेह घरी येतात. अपघातानंतर अख्खे कुटुंबच विस्कळित होते. अपंगत्वातून बचावलेले अनेकजण व्यथित आहेत.

म्हणून सिग्नलवर जीवनातला एक मिनिट वाया घाला; पण आपला एका मिनिट वाचविण्यासाठी जीवन वाया घालू नका, असा मोलाचा संदेश नागपूर येथील "जनआक्रोश'च्या वाहतूक जागृती कार्यक्रमातून अधोरेखित झाला. गुरुवारी (ता.23) देवगिरी महाविद्यालयात औरंगाबाद फर्स्टतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. 

नागपूर येथे नागरिकांच्या पुढाकारातून तयार झालेल्या जनआक्रोश संस्थेद्वारे वाहतूकविषयक जागृती केली जाते. संस्थेचे दिलीप मुकेवार, ललित तपासे व रवी कासखेडीकर यांनी गुरुवारी अपघातविषयक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले.

धक्कादायक... 

  • देशात दर मिनिटाला एक रस्ता अपघात 
  • चार मिनिटाला एकाचा मृत्यू 
  • एका तासाला 53 रस्ते अपघात 
  • एका तासाला 16 जणांचा मृत्यू 
  • दिवसाला 400 जणांचा मृत्यू 

त्यात अपघाताची कारणे, परिणाम, वाहतूक जागृती व जनआक्रोशचे काम याविषयांचा समावेश होता. आपण कितीही दर्जेदार वाहन चालवीत असलो अथवा कार रेसर जरी असलो तरी अपघात होऊ शकतो हे अश्‍विन सुंदर या रेसरचे उदाहरण त्यांनी दिले. जगाच्या तुलनेत भारतात दोन टक्के वाहने आहेत; पण अपघाताचे प्रमाण भयावह आहे, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, हेमंत लांडगे, सत्यजित खारकर, योगिता नहार, विश्‍वनाथ जालानपूरकर, उल्हास गवळी, श्रीराजकर्णे, अनिल माळी, रमेश नागपाल, जेम्स अंबिलढगे, वाहतूक पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन 
रोड सेफ्टी 2018 ला प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार... 

  1. 2010 ला जगातील वाहनाची संख्या : 101.5 कोटी 
  2. भारतातील वाहनसंख्या : 2.8 कोटी (प्रमाण 2.04 टक्के) 
  3. रस्ता अपघातात दरवर्षी जगात 13 लाख 50 हजार जणांचा मृत्यू. 
  4. भारतात दीड लाख व्यक्तींचा मृत्यू (जगाच्या तुलनेत प्रमाण 9 टक्के) 
  5. भारतात 2017 मध्ये 4.60 लाख अपघात. 
  6. यात 1.46 लाख जणांचा मृत्यू. 
  7. 1.46 लाख मृतात 49.9 टक्के 18 ते 35 वयोगटातील व्यक्तींचा समावेश 
  8. 18 पेक्षा कमी वयोगटातील मृतांचे 6.5 टक्के प्रमाण. 

आपल्या कुटुंबासाठी हे करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com