शेतकऱ्यांनो, अशा वाचवा फळबागा, ही घ्या काळजी

सुषेन जाधव
Sunday, 17 May 2020

महिन्यातील तापमान लक्षात घेता फळबागा जपण्याचे आव्हान आहे. यंदा लवकरच तापमानात भरीव वाढ झाली असली, तरी शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार फळबागांना जपल्यास धोका संभवत नसल्याचे सांगत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काही शिफारशी सुचविल्या आहेत. सेंद्रिय आच्छादन हा कमीत कमी खर्चात, अल्पावधीत सहज करता येणार उपाय असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

औरंगाबाद : मे महिन्यातील तापमान लक्षात घेता फळबागा जपण्याचे आव्हान आहे. यंदा लवकरच तापमानात भरीव वाढ झाली असली, तरी शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार फळबागांना जपल्यास धोका संभवत नसल्याचे सांगत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काही शिफारशी सुचविल्या आहेत. सेंद्रिय आच्छादन हा कमीत कमी खर्चात, अल्पावधीत सहज करता येणार उपाय असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

कृषी विद्यापीठाअंतर्गत औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सु. बा. पवार यांनी सांगितले, की सध्या तापमानाची झळ वाढत आहे, अशा परिस्थितीत फळबागांना जपणे हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. मागील वर्षी पावसाळ्यात सरतेशेवटी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यंदा फळबागांची चांगली स्थिती आहे, असे असले, तरी फळांचीही स्थिती चांगली असल्याने पाणी जास्त लागणे साहजिकच आहे.

ही वापरा त्रिसूत्री
मुख्यत्वेकरून फळबागांना तापमानापासून वाचविण्यासाठी सेंद्रिय आच्छादन, तीस मायक्रॉनपर्यंत प्लॅस्टिक आच्छादन, फळे, फांद्यांची विरळणी ही त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले. फळबागेला पोटॅशिअम नायट्रेट हे २०० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

मोसंबीसाठी ठिबक सिंचन असेल तर प्रतिदिवस ८० लिटर (फळ असल्यास) आणि फळे नसतील तर ५ ते सहा लिटर द्यावे. मोसंबीच्या झाडांची छाटणी करावी (फांद्या कमी कराव्यात. यामुळे पानांवाटे होणारे बाष्प होणार नाही; तसेच फळांची संख्या कमी झाली तर पाणीही कमी लागते.) डाळिंबाला जर फळे असतील तर ३५ ते ४० लिटर प्रतिदिवस पाणी द्यावे.

प्लॅस्टिक डाळिंबाला कव्हर करून घ्यावे. डाळिंबालाही सेंद्रिय आच्छादन करावे. लहान असेल तर झाकून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सोबतच आठशे ग्रॅम केओलिन दहा लिटर पाण्यात मिसळून फवारले तरी चालेल, असेही डॉ. पवार म्हणाले.

हे नक्की वाचा- पोलिस, डॉक्टर, परिचारिकांनी कुठवर झेलायचे हल्ले? आता होईल सात वर्षे शिक्षा

आंब्याच्या रोपांना करा सावली
आंबेबहार धरल्याने या फळझाडाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जानेवारीमध्ये ताण सोडला असल्याने या बागेस ताण सोडून तीन महिने झाले आहेत. तिसरे जी पाच वर्षांखालील बाग असेल त्याही बागेची काळजी घ्यावी लागणार आहे.

लहान झाडांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडास सावली करण्याचे आवाहन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी केले आहे; तसेच बागांना सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 

 
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Agriculture University Advice to Farmer