esakal | मानवांची दिवाळी पक्षांची मात्र पळापळी! 
sakal

बोलून बातमी शोधा

bird.jpg

गावामध्ये फटाक्यांचा होणाऱ्या आवाजाच्या धास्तीने माळरानावर बसलेला पाखरांचे थवेच थवे.

मानवांची दिवाळी पक्षांची मात्र पळापळी! 

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (औरंगाबाद) : दिपावलीच्या सणानिमित्त वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाला घाबरत ग्रामीण भागातील पशु-पक्षांनाविस्थापित होऊन आपली दिवाळी गावाबाहेर साजरी करण्याची वेळ शिकल्या सवरल्या माणसांनी आणली आहे. मनुष्याच्या उत्सव प्रियतेचे आपण गोडवे गातो. आभिमानास्पद संकृती वारसा सांगतो. पण आता आपल्याच माणसांनी पारंपारिक सणांचे कसे विकृतीकरण चालविले आहे, याचे हे उदाहरण म्हणता येईल. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दिवाळीतील दिपोत्सवाला आभिशाप ठरत असलेल्या फटाक्यांमुळे मानवी जीवनावर तर विघातक परिणाम होतच आहे. परंतु फटाक्यांच्या आवाजामुळे वन्यजीव सैरभैर होताना दिसत आहेत. दिवाळीच्या काळात गावापासून दूर माळरानावर निर्वासित पक्षांचे थवे दिसत आहे. या पृथ्वीतलावर केवळ आपणच जगतो आणि जगावे आशीच जणू माणसाची धारणा बनली आहे का, आसा प्रश्न पडतो. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये गोंगाट बंदीचे आदेश जारी करत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेदरम्यान फटाके फोडले जाऊ नयेत, असे बजावले आहे. परंतु या आदेशाची पायमल्ली होते. फटाक्यांमुळे दिवाळीच्या काळात अपघाताच्या प्रमाण वाढले असून पैशाचा अपव्यय करून सल्फरकोल संयुगे, पोटॅश, फॅास्परस, क्लोरेटमुळे होणारा विषारी वायुवांचा प्रादुर्भाव विकत घेण्यासाठी मुलाबाळासह पालकांची गर्दी असते. फटाके फोडून कचरा, धूर ईतर दुष्परिणाम आपण किती दिवस पदरी पाडून घेणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा विचार करता राज्यात फटाक्यांची किमान 100 कोटींची उलाढाल होते. फटाका मार्केटमधील दुकानंची वर्षागणिक वाढणारी संख्या, खरेदीसाठी उडणारी झुंबड अचंबित करून जाते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय संस्कृतीत दिपावलीचा उत्सव मनुष्याच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, आत्मसमाधानासाठी व तेजोवृद्धीसाठी योजलेला असून प्रत्येकाने फटाकेमुक्त दिपावली उत्सव साजरा करण्याची नितांत गरज आहे. यामुळे पैसा व नैसर्गिक हानी रोखण्यासाठी मदत होईल. फटक्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. व त्यावरील होणाराखर्च योग्य ठिकाणी केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. संदीप गुरमे (पोलीस निरिक्षक) 

(संपादन-प्रताप अवचार)