चिश्तिया कॉलनीतील हुक्का पार्लरवर छापा !  

प्रकाश बनकर
Thursday, 1 October 2020

साडेसहा हजारांचे फ्लेवर जप्त; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

औरंगाबाद : सिडकोतील चिश्तिया कॉलनीत सुरू असलेल्या ‘सुफीज लन्ज’ रेस्टॉरंटमधील हुक्का पार्लरवर मंगळवारी (ता.२९) पोलिसांनी छापा मारून १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेसहा हजारांचे फ्लेवर जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी हॉटेलमालकांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरात अंमली पदार्थाविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सिडकोतील चिश्तिया कॉलनी परिसरात अनेक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होता. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारात पोलिसांनी छापा मारला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्फराज चिश्ती, शकील चिश्ती, २०, रा. आरेफ कॉलनी, राहुल आत्माराम साळवे, ३०, रा. पडेगाव, साळवे सोसायटी, राजधानीनगर, आनंद बाबूराव खपरे, २३, रा. शिवाजीनगर, घुंगर्डे हदगाव, ता. अंबड, जि. जालना, ऋषिकेश विष्णू नाब्दे, २१, रा. शिवाजीनगर, सागर संतोष वारेकर, २७, एन-२, कासलीवाल मार्वेष्ठट, स्वप्नील रामराव नागरगोजे, २७, हरिरामनगर बीडबायपास, प्रवीण मच्छिंद्र झिंजुर्डे, २३, रा. गादिया विहार, पहाडे पार्क, प्रतीक किरीट सोनी, २७, रा. सिडको एन-१, तौसिफ रमिजखान पठाण, २४, रा अंबरहिल, जटवाडा रोड, हर्सूल,अमीर सुभान पटेल, २३, रा. चिश्तिया चौक, सय्यद सर्फराज सलीम, २५, रा. रहेमानिया कॉलनी, महंमद समीर महंमद नासेरखान, २१, रा. बेगमपुरा, शेख इम्रान शेख गुलाब, २५, रा. जहांगीर कॉलनी, सय्यद जुबेर सय्यद पाशा, २३, रा. आझाद चौक, मीर रसद पठाण, २६, रा. एन-१२ हडको हे नशा करताना आढळून आले. तर इम्रान खान गुलाब खान, ३०, रा. टाइम्स कॉलनी याने नशा करण्यासाठी तंबाखूजन्य हुक्का तसेच जेवण पुरविल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सहा हजारांचा मुद्देमाल जप्त 
या हुक्का पार्लरमध्ये ३ हजार ५०० रुपये किमतीचे ३ हुक्का पॉट, तंबाखू फ्लेवरचे २० पॉकेट ३ हजार रुपये असा ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पोलिस हवालदार दिनेश बन, जाधव, सोनवणे, शिरसाठ यांनी ही कारवाई केली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Hookah Parlor in Chishtia Colony