Ganesh Utsav : गणेश महासंघाच्या कार्यालयात "श्री" ची प्रतिष्ठापना

मधुकर कांबळे
Saturday, 22 August 2020

जिल्हा गणेश महासंघ, गणेश उत्सव समितीच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

औरंगाबाद : जिल्हा गणेश महासंघ, गणेश उत्सव समितीच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची प्रतिष्ठापना श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शनिवारी (ता.२२) रोजी सकाळी १०:३० वाजता बालाजी मंदिर, ग्रामदैवत श्री संस्थान गणपती समोर, राजाबाजार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, सतीश चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडले, औरंगाबाद जिल्हा श्रीगणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, व श्री गणेश महासंघ, श्री गणेश उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर तुळशीबागवाले, प्रकाश मुगदिया, अनिल मकरिये,काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, प्रफुल्ल मालानी, माजी नगरसेवक सचिन खैरे, भाऊसाहेब जगताप, शिवाजी कवडे, गोपी घोडले, लक्ष्मीनारायण बाखरिया,अनिल मानकापे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अभिजित देशमुख, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, एच. एस. भापकर, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, यांची उपस्थिती होती. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती आरती करून त्यानंतर औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा असे गणेश भक्तांना आवाहन केले.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

याप्रसंगी श्री गणेश महासंघाचे सुरेश टाक, हरीश शिंदे, सुरज तुळशीबागवाले, अनिल शिरसागर, शिवाजी लिंगायत, राजू पारगावकर, उल्हास नरवाडे, चंद्रकांत जारे, चेतन यादव, किशोर चव्हाण, संदीप शेळके, सचिन अंभोरे, राजेंद्र दाते, सुभाष उदावंत, कमलाकर दहिवाल, रितेश तुळशीबागवाले, अनिल चव्हाण, संतोष गादिया, शैलेश पाटणी, राहुल सावंत, गौरव जैस्वाल, पप्पू ठुबे, मोहित जाधव, सुनील अजमेरा, यांची उपस्थिती होती. 

काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर 

दरवर्षी औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश उत्सवाची परंपरा व संस्कृती जोपासावी यासाठी शासनाने आदेशित केलेल्या सर्व नियमांचे अटींचे तसेच सोशल डीस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांनी राबविण्यात येत असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर तुळशीबागवाले यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Ganesh Mahasangh office Bappa welcome