औरंगाबाद : स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धेत शाहू अभियांत्रिकी देशात प्रथम

shahu.jpg
shahu.jpg

औरंगाबाद : स्मार्ट इंडिया हॅकथॉन - २०२० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सीएसएमएसएसच्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. एक ऑगस्ट तीन ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन स्पर्धा झाली. यात देशभरातील १०८१ संघांना सहभाग नोंदवला होता.

 
मानव संसाधन विकास मंत्रालय आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिटलोडर्स या टीम अंतर्गत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तीन दिवस-रात्र मेहनत करून प्रकल्प तयार केला. आंध्रप्रदेश सरकारसमोरील प्रश्न होता कि, मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची तपासणी, त्यांना लागणारी औषधी लवकर बाजारात उपलब्ध होऊन वेळेत औषध देता आली पाहिजेत जेणेकरून, प्राण्याची जीवितहानी होणार नाही तसेच, वेळेची बचत व्हावी. या समस्येवर बिटलोडर्स टीमने सॉफ्टवेअर बनविले आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  
प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, प्रा. योगेश नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात सुदर्शन चव्हाण, प्रमोद गायकवाड, वीरेंद्र जीवरग, हर्षल पाटील, प्रतीक्षा नाईक, समृद्धी गाढे, निखील वायकोस या विद्यार्थांनी सॉफ्टवेअर तयार केले. संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकिय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. 

असे आहे सॉफ्टवेअर 
बिटलोडर्सच्या टीमने बनविलेल्या सॉफ्टवेअरमध्ये डॉक्टरांनी तपासणी केल्यावर प्राण्यांसाठी लागणारी औषधांची नोंद मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल, सदरील औषध काही वेळात डॉक्टरांपर्यंत पोहचवले जाईल, जर औषध उपलब्ध नसतील तर, प्राणांच्या औषधाची ठोक विक्रेते यांच्याकडे यादी उपलब्ध होईल, त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर त्यांच्याकडून ती तात्काळ उत्पादन करणारी कंपनीकडे मागणी नोंदविल्या जाईल. मालाची उत्पादन करून सदरील मेडिसिन तात्काळ डॉक्टरांकडे पाठविल्या जाईल. याची सर्व व्यवस्था या सॉफ्टवेअर मध्ये करून देण्यात आली आहे. 

संपादन-प्रताप अवचार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com