तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया.. 

tantrashikshan.jpg
tantrashikshan.jpg

औरंगाबाद : दहावीनंतर तीन वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका तसेच, बारावी विज्ञान नंतरच्या औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी (ता.१०) सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज २५ ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत.

पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यात  ३४१ तर, औरंगाबाद विभागात ५२ सुविधा केंद्रे आहेत. तसेच औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी राज्यात २४८ तर, औरंगाबाद विभागात ५३ सुविधा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातून आठवी नववी व दहावी उत्तीर्ण असण्याची पात्रता व आता बदलण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातून केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र राहतील.

प्रत्यक्ष न येणाऱ्यांसाठी..
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे, तसेच सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यासाठी शासकीय व अनुदानित संस्था या ई सुविधा केंद्र म्हणून काम पाहतील.
पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   

केंद्रावर येणाऱ्यांसाठी..
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सुविधा केंद्रावर प्रत्यक्षपणे येऊन कागदपत्रांची तपासणी करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित तारीख व वेळ निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रमाणपत्रांबाबतचा निर्णय..
सद्य परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मिळवणे, जिकिरीचे झाले आहे. हे लक्षात घेऊन अर्ज करताना यावर्षी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य नाही. असा बदल केलेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे पण, जात वैधता प्रमाणपत्र अर्ज करताना सादर करण्याची आवश्यकता नाही.

असे असेल शुल्क..
सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी, जम्मू-काश्मीर, लडाख या क्षेत्रातील विस्थापित विद्यार्थ्यांसाठी अर्जाचे शुल्क रुपये चारशे रुपये, महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी व दिव्यांगासाठी अर्जाचे शुल्क तीनशे रुपये आहे.

राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्था - ४०१
एकूण जागा - १ लाख १९ हजार ५९५
औरंगाबाद विभागातील संस्था - ५८
औरंगाबाद विभागातील जागा - १७ हजार २१४

राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदविका संस्था - ३९५
एकूण जागा -२४ हजार ५६७
औरंगाबाद विभागातील संस्था - ८८
औरंगाबाद विभागातील जागा - ५७२८

Edit-Pratap Awachar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com