औरंगाबाद : शिवाजीनगरात दोन तास ट्रॅफिक जाम

Two hours traffic jam At Shivajinagar Railway Crossing
Two hours traffic jam At Shivajinagar Railway Crossing

औरंगाबाद - एका वाहनाने धडक दिल्यामुळे शिवाजीनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर गेट फसल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 23) रात्री घडला. त्यानंतर गेट उघडण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 

शिवाजीनगर रेल्वेक्रॉसिंग वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. रेल्वेगाड्यांची वर्दळ वाढल्यामुळे दिवसभरात नागरिकांना याठिकाणी ताटकळावे लागते. रेल्वे गेल्यानंतरही ट्रॅफिक जाम होते. त्यातून वाट काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येते. नित्याचा हा त्रास सोडविण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी वर्षानुवर्षे सुरू आहे; मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री दोन तास वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. डेमो रेल्वे येणार असल्याने गेटमनने गेट बंद केले.

यावेळी एका वाहनाने गेटला धडक दिली. त्यामुळे गेट बेंड होऊ फसल्या गेले. डेमो रेल्वे गेल्यानंतर गेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते उघडले नाही. त्यामुळे गेट दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी बोलावून दुरुस्ती करेपर्यंत सुमारे दोन तासांचा वेळ गेला. त्यामुळे रात्रीच्यावेळी घरी परतणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. तरुणांनी यावेळी मोठी आरडा-ओरड केली; पण उपयोग झाला नाही. 

वाहतूक पोलिस नियुक्त करावा 
शिवाजीनगरमधील ट्रॅफिक जाम नित्याचीच झाली आहे. रेल्वे गेल्यानंतर वाहनचालक मनमानी पद्धतीने गाड्या घुसवितात. याठिकाणी चोवीस तास वाहतूक पोलिसाची नियुक्ती केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, म्हणून वाहतूक पोलिसांची मागणी वारंवार केली जात असल्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com