esakal | निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी 'वसुधंरा बचाव उपक्रम' : अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा
sakal

बोलून बातमी शोधा

h m desarda.jpg

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांची माहिती. शनिवारी (ता.१४) सकाळी ११ वाजता शहागंज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ प्रार्थना करणार आहेत.  निसर्गाविषयाचा पूज्यभाव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 

निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी 'वसुधंरा बचाव उपक्रम' : अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : पर्यावरणीय विद्ध्वंस थांबवणे आणि अभावग्रस्तांना आर्थिक सुरक्षितता दिल्याशिवाय विकास होणार नाही. निसर्गावर मात करणाऱ्या मानवाला कोरोनाच्या संसर्गाने धडा शिकवला आहे. या परिस्थितीत विकासाची पुनर्व्याख्या करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी शुक्रवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यासाठी प्रा. देसरडा शनिवारी सकाळी ११ वाजता शहागंज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ प्रार्थना करणार आहेत.  निसर्गाविषयाचा पूज्यभाव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

श्री. देसरडा म्हणाले, की कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी प्रा. देसरडा यांनी लक्षवेधी मुद्दे मांडले आहेत. पर्यावरणीय विद्ध्वंसाबाबत ते म्हणाले की, ‘भारतातील १३८ कोटी लोकसंख्येपैकी तब्बल शंभर कोटी लोक कमी-अधिक प्रमाणात अभावग्रस्त जगत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुकेश अंबानी यांचे उत्पन्न तासाला ९० कोटी रुपये आहे आणि ९० कोटी भारतीयांचे उत्पन्न नऊ रुपयेदेखील नाही. समाजाच्या जगण्यात भयावह विषमता आहे. चंगळवादी जीवनशैलीमुळे शहरे प्रदूषित झाली आहेत. किमान दिवाळी सण फटाकेमुक्त साजरा करुन प्रदूषणावर मात करा. कारण करोनाच्या परिस्थितीत श्वसनाचे विकार जडण्यासाठी प्रदूषण कारणीभूत ठरेल’, असे देसरडा म्हणाले. विकासाचा गाजावाजा करुनही आर्थिक समानता नाही. देशात २० टक्के लोक अतिपोषित आहेत आणि ३० टक्के कुपोषित आहेत. ही विषमता कशामुळे आली, असा प्रश्नही श्री. देसरडा यांनी उपस्थित केला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन- प्रताप अवचार)