धक्कादायक : पतीस सोडायला गेली, जगच सोडून गेली!

Women killed in bus Accident At Ramnagar
Women killed in bus Accident At Ramnagar

औरंगाबाद - कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या एका बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठच्या सुमारास रामनगरातील सह्याद्री हॉस्पिटलसमोर घडली. या भीषण अपघातात ललिता शंकर ढगे (39, रा. कासलीवाल पूर्व, चिकलठाणा विमानतळासमोर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालकाने बससह घटनास्थळावरून धूम ठोकल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली. 

वाळूज एमआयडीसी भागातील बडवे इंजिनिअरिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून शंकर ढगे हे नोकरीला आहेत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना कंपनीच्या बसमध्ये बसविण्यासाठी ललिता यांनी चिकलठाणा परिसरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीने सोडले. तेथून ललिता या पुन्हा घरी गेल्या. पुढे सकाळी सव्वाआठच्या सुमारास जीमला जाण्यासाठी त्या दुचाकीने (एमएच-20, सीसी- 9300) घराबाहेर पडल्या. जालना रोडवरील रामनगरजवळ असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलसमोर सध्या इंटरनेट केबलचे काम सुरू आहे. या केबलमध्ये ललिता यांच्या दुचाकीचे समोरील चाक अडकले. त्यामुळे तोल जाऊन ललिता रस्त्यावर पडल्या. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या बसचालकाने त्यांना समोरच्या चाकाखाली चिरडले.

डोक्‍यावरून बसचे चाक गेल्याने ललिता यांचा जागीच मृत्यू झाला. हा भयंकर अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.  दरम्यान, अपघात घडताच बसचालकाने बससह घटनास्थळावरून धूम ठोकली. अपघाताची माहिती मिळताच माजी महापौर भगवान घडामोडे यांनीही धाव घेतली. यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ललिता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल
  
रस्त्यालगतच्या वायर कोण उचलणार? 
सध्या शहरातील विविध भागांत इंटरनेटसह अन्य केबल वायर लोंबकाळत तर काही ठिकाणी रस्त्यावर पडलेले पाहायला मिळते. रस्त्याच्या कडेला असलेल्या वायरमुळेही छोटे-छोटे अपघात झाल्याचे समोर आलेले असतानाही महापालिका हे वायर का दूर करीत नाहीत, की ही त्यांची जबाबदारी नाही? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. शहराच्या अनेक भागांतील रस्त्याच्या कडेला पडलेले असे वायर अजून किती जणांचा बळी घेण्याची वाट पाहणार आहे का? असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com